स्पेशल

पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना देते 8 लाख रुपये! जाणून घ्या किती करावी लागेल गुंतवणूक आणि किती वर्षांसाठी?

Post Office Scheme:- भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्याच्या उद्देशाने गुंतवणूक ही खूप महत्त्वाची संकल्पना आहे. त्यामुळे तुम्ही करत असलेली नोकरी किंवा व्यवसाय या माध्यमातून कमावलेल्या पैशांची बचत व त्या बचतीमधून केलेली पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक ही समृद्ध आर्थिक भविष्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असते.

आपल्याला माहित आहे की गुंतवणुकीचे असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत.परंतु गुंतवणूक करताना कुठलाही गुंतवणूकदार आपले पैसे सुरक्षित राहतील आणि चांगला परतावा मिळेल या दृष्टिकोनातून गुंतवणूक पर्यायांची निवड करत असतो व यामध्ये पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना या महत्त्वाच्या ठरतात.

पोस्ट ऑफिसच्या योजना या गुंतवणूक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि मिळणाऱ्या परताव्याकरिता लोकप्रिय अशा आहेत व गेल्या काही वर्षांचा विचार केला तर पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण आपल्याला वाढताना दिसून येत आहे. पोस्ट ऑफिसच्या एफडी योजना आहेतच परंतु बचत योजना देखील आहेत.

यामध्ये जर आपण पोस्टाची पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आरडी योजना जर बघितली तर ती गुंतवणूक व त्यावर मिळणारा परतावा यासाठी विशेष लोकप्रिय आहे. या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही यामध्ये जितके पैशांची गुंतवणूक कराल तितका जास्त परतावा तुम्हाला मिळतो.

कसे आहे पोस्टाच्या रिकरिंग डिपॉझिट योजनेचे स्वरूप?
पोस्ट ऑफिसच्या लोकप्रिय योजनांपैकी पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आरडी योजना गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून खूपच फायद्याची अशी योजना आहे.

या योजनेमध्ये तुम्ही जितके जास्त पैसे गुंतवाल तेवढा जास्त परतावा तुम्हाला मिळतो.तुम्ही महिन्याला पाच हजार रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला आठ लाख रुपये मिळू शकतात व महिन्याला दहा हजार रुपयांची गुंतवणूक केली तर 16 लाख रुपयांचा परतावा तुम्हाला मिळतो.

तसेच कमीत कमी गुंतवणूक जरी या योजनेत केली तरी देखील तुम्हाला उत्तम असा परतावा मिळतो.कमी गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजना खूप फायद्याची आहे.

या योजनेचा कालावधी हा पाच वर्षाचा असतो व या योजनेत तुम्हाला जर पाच वर्षे व्यतिरिक्त कालावधीत वाढ करायची असेल तर तुम्ही पाच वर्षाच्या टप्प्यात दोनदा वाढ करू शकतात.कमीत कमी शंभर रुपयांपासून या योजनेत गुंतवणूक करता येऊ शकते व कमाल म्हणजे जास्तीत जास्त कितीही रक्कम या योजनेत गुंतवू शकतात.

आता या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर 6.7% इतके व्याज मिळत असून यामध्ये चक्रवाढ व्याजाचा देखील लाभ तुम्हाला मिळतो.तुम्ही दर महिन्याला पाच हजार रुपये गुंतवले व ही गुंतवणूक सातत्याने दहा वर्षांपर्यंत सुरू ठेवली तर तुम्हाला व्याज आणि मुद्दल असे मिळून आठ लाख 54 हजार 272 रुपये मिळतात.

तुम्हाला या योजनेमध्ये जो काही चक्रवाढ व्याजाचा लाभ दिला जातो तो तिमाही आधारावर दिला जातो. या योजनेमध्ये जर तुम्ही मात्र प्रत्येक महिन्याला जर पैसे जमा केले नाहीत तर तुम्हाला शंभर रुपये मागे एक रुपये दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे या योजनेत दर महिन्याला गुंतवणुकीत सातत्य ठेवणे खूप गरजेचे असते.या योजनेमध्ये सिंगल खाते उघडता येते किंवा जॉइंट अकाउंट देखील तुम्ही उघडू शकतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts