LIC Scheme:- जर आपण गुंतवणुकीचे विविध पर्याय बघितले तर यामध्ये गुंतवणुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बँकांच्या मुदत ठेव योजना तसेच पोस्ट ऑफिसच्या योजना व सोबतच भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीच्या देखील अनेक योजना खूप फायदेशीर आहेत.
एलआयसीच्या योजना बघितल्या तर यामध्ये तुम्हाला गुंतवणुकीवर परतावा मिळतोच. परंतु विमा संरक्षण देखील मिळते. एलआयसीच्या माध्यमातून अनेक गुंतवणूक योजना ऑफर केल्या गेल्या आहेत व या माध्यमातून तुम्ही तुमच्या आर्थिक क्षमतेचा विचार करून एखाद्या योजनेची किंवा पॉलिसीची निवड गुंतवणुकीसाठी करू शकतात.
जीवनामध्ये प्रत्येक पालकाला आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून आर्थिक दृष्ट्या नियोजन करणे गरजेचे असते. मुलांचेच नाहीतर मुलींचे आर्थिक दृष्ट्या भविष्य सुरक्षित राहावे हे प्रत्येक पालकाला वाटते.
त्यामुळे एलआयसीच्या माध्यमातून आर्थिक भविष्य सुरक्षित राहावे याकरिता कन्यादान पॉलिसी हा प्लान किंवा ही योजना आखण्यात आली असून ही एक महत्वपूर्ण योजना असून यात गुंतवणूक केल्यावर मुलींना आर्थिक दृष्ट्या सुरक्षित भविष्य मिळते.
काय आहे एलआयसीची कन्यादान पॉलिसी?
एलआयसीच्या कन्यादान पॉलिसीच्या माध्यमातून तुम्ही महिन्याला किंवा तीन महिना, सहायिक व वार्षिक आधारावर हप्ते भरू शकतात. कन्यादान पॉलिसीची कमीत कमी मुदत तेरा वर्षे आणि जास्तीत जास्त 25 वर्षे इतकी आहे.
समजा तुम्हाला या योजनेमध्ये गुंतवणूक करायची आहे व यामध्ये तुम्ही जर पंचवीस वर्षांची मुदतीची निवड केली तर तुम्हाला 25 वर्षे प्रीमियम न भरता फक्त तो बावीस वर्षे भरावा लागेल. तसेच पालक किंवा पालकाचे वय पॉलिसी खरेदी करताना 18 वर्षे किंवा कमाल पन्नास वर्षे असणे गरजेचे आहे.
जेव्हा या योजनेची मॅच्युरिटी पूर्ण होईल तेव्हा विम्याची रक्कम तसेच त्यासोबत मॅच्युरिटी बोनस तसेच अंतिम बोनस देखील या माध्यमातून मिळतो.तसेच या पॉलिसीच्या माध्यमातून जी रक्कम गुंतवलेली असते त्या रकमेवर वार्षिक दीड लाख रुपयांपर्यंतचा कर लाभ देखील मिळतो.
कन्यादान योजनेच्या माध्यमातून मुलगी कशी होते लखपती?
एलआयसीच्या कन्यादान पॉलिसीच्या माध्यमातून जर तुम्ही प्रत्येक महिन्याला तीन हजार चारशे पन्नास रुपये प्रीमियम भरायला सुरुवात केली तर तुम्हाला एका वर्षाकरिता साधारणपणे 41,400 प्रीमियम भरणे गरजेचे आहे. तसेच यामध्ये तुम्ही पंचवीस वर्षाकरिता पॉलिसी निवडली असेल तर तुम्हाला बावीस वर्षे प्रीमियम भरावा लागेल.
अशाप्रकारे तुम्ही 22 वर्षात एकूण नऊ लाख दहा हजार आठशे रुपयांची गुंतवणूक कराल आणि पंचवीस वर्षानंतर जेव्हा पॉलिसी मॅच्युअर होईल तेव्हा तुमच्या मुलीला अंदाजे 25 लाख रुपये या माध्यमातून मिळतील.
महिलांसाठी फायदेशीर आहे एलआयसीची आधारशिला योजना
मुलींसाठी ज्याप्रमाणे एलआयसीची कन्यादान योजना फायदेशीर आहे.तसेच महिलांसाठी देखील एलआयसीचीआधारशीला ही योजना खास वैशिष्ट्येपूर्ण आणि फायद्याची आहे. महिलांना या योजनेच्या माध्यमातून विमा मिळतोच परंतु दीर्घकालीन बचत देखील करता येते.
या योजनेत गुंतवणूक करून महिला कुटुंबाचे आणि मुलांचे भविष्य सुरक्षित करू शकतात. तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक केली आहे व त्या दरम्यान जर तुमचा मृत्यू झाला तरी लाभ दिला जातो. यामध्ये नॉमिनीला यासंबंधीची विमा रक्कम मिळत असते.
समजा पॉलिसी सुरू झाली आहे व त्यापासून पाच वर्षांनी पॉलिसी धारकाचा जर दुर्दैवी मृत्यू झाला तर नॉमिनीला विमा रक्कम तसेच हमी बोनस देखील मिळतो.
तसेच पॉलिसीचे मुदत जेव्हा पूर्ण होते तेव्हा पॉलिसीधारकाला मॅच्युरिटी बेनिफिट आणि गॅरेंटेड बोनस व त्यासह विम्याची रक्कम देखील मिळते. एलआयसीच्या या आधारशीला योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान वय आठ वर्षे ते कमाल 55 वर्षे असणे गरजेचे आहे.