स्पेशल

तुम्हाला जर लवकरात लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर ‘या’ पिकाची करा लागवड! या पिकापासून तयार केलेले तेल विकले जाते 20 हजार रुपये लिटरपर्यंत

Profitable Crop Planting:- तुम्हाला जर आयुष्यामध्ये शेतीमधून काही कमवायचे असेल तर नक्कीच काहीतरी वेगवेगळ्या कल्पना आणि प्रयोग शेतीमध्ये राबवणे गरजेचे असते आणि या आधुनिक कालावधीमध्ये देखील आता शेती ही आधुनिक होत असल्याने शेतीमध्ये देखील आता आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक पिक पद्धतीचा अवलंब मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.

वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीतून आता शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतीतून नफा मिळवत आहेत. शेती मधून जर तुम्हाला काहीतरी वेगळे करायचे असेल तर तुम्हाला पारंपारिक शेतीच्या चौकटीच्या बाहेर येऊन काहीतरी वेगळे करणे गरजेचे राहिल व ती आता काळाची गरज आहे.

या अनुषंगाने जर तुम्हाला देखील कमीत कमी कालावधीत शेती मधून चांगला पैसा मिळवायचा असेल तर तुम्ही जिरेनियम या पिकाची लागवड करू शकतात व या माध्यमातून तुम्ही खूप जास्त प्रमाणामध्ये नफा मिळवू शकतात.

जिरेनियम पिकाला जे काही फुल येते किंवा जिरेनियम पासून जे काही तेल तयार केले जाते त्याची किंमत आज बाजारामध्ये 20 हजार रुपये प्रतिलिटर इतके आहे यात तेल निर्मितीतूनच तुम्ही लाखो रुपये मिळवू शकतात.

जिरेनियम लागवड शेतकऱ्यांसाठी ठरेल फायद्याचे
शेतकऱ्यांनी जर पारंपारिक पिकांना फाटा देत जिरेनियम पिकाची लागवड केली तर कमीत कमी खर्चात भरघोस नफा मिळवण्याची क्षमता या पिकात असल्यामुळे शेतकऱ्यांना ते फायदेशीर ठरू शकते. जिरेनियमच्या फुलापासून काढलेल्या किंवा बनवलेल्या तेलाची किंमत आज बाजारात 20 हजार रुपये प्रतिलिटर इतकी आहे.

जिरेनीयमला गरिबांचा गुलाब असे देखील म्हटले जाते व त्याचा वास हा गुलाबासारखाच असतो. या पिकाला तांबडी किंवा पांढरी फुले येतात व हे एकमेव असे पीक आहे की त्याच्या फुलापासून सुगंधी तेल काढले जाते व या तेलाचा उपयोग औषध निर्मिती उद्योग तसेच साबण, परफ्यूम आणि सौंदर्यप्रसाधने बनवण्यासाठी केला जातो. हे तेल बाजारामध्ये खूप महाग विकले जाते व त्यामुळे शेतकऱ्यांना खूप उत्तम नफा या माध्यमातून मिळतो.

कमी पावसाच्या भागात देखील करता येते लागवड
जिरेनियम लागवडीचा खर्च हा खूपच कमी असतो व त्याची लागवड तुम्ही कुठेही करू शकतात. अगदी वालूकामय चिकन माती असेल तरी त्याच्या लागवडीसाठी ही उत्तम मानली जाते. मातीचा पीएच मूल्य साडेपाच ते साडेसात पेक्षा जास्त असेल तरी जिरेनियम पिकासाठी ते चांगले मानले जाते.

तसेच या पिकाला खूप कमीत कमी पाणी लागते व त्यामुळे कमी पाऊस असलेल्या भागात देखील याची लागवड करता येते. साधारणपणे एक लाख रुपये खर्च या पिकाच्या लागवडी करता येतो व त्यातून तयार होणारे तेल तुम्ही 20000 रुपये लिटरने बाजारात विकू शकतात. एकदा लागवड केल्यानंतर चार ते पाच वर्षापर्यंत हे पीक उत्पादन देते. म्हणजेच एकदा की तुम्ही जिरेनियम शेतीमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला चार ते पाच वर्षापर्यंत नफा मिळवता येणे शक्य आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts