बऱ्याच व्यक्तींना सहाशी पर्यटनाची नितांत हौस असते. असे पर्यटक महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये फिरण्याचा आणि ट्रेकिंगचा साहसी अनुभव घेण्यासाठी आसुसलेले असतात. महाराष्ट्र मध्ये असे अनेक गड किल्ले, मोठमोठ्या डोंगर रांगा असून अशा पर्यटकांना त्या नेहमी खुणावत असतात. साधारणपणे पावसाळ्याच्या कालावधीमध्ये गडकिल्ले तसेच डोंगरांच्या कडा कपारीतून फिरण्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो.
महाराष्ट्रामध्ये अशी अनेक जिल्ह्यांना एक ऐतिहासिक परंपरा लाभली असून त्या दृष्टिकोनातून अनेक वारसा स्थळे अशा जिल्ह्यांमध्ये आहेत. याला नाशिक जिल्हा देखील अपवाद नाही. नाशिक जिल्ह्यामध्ये देखील असाच एक ऐतिहासिक किल्ला असून त्याचे नाव हरिहर किल्ला असे आहे. ज्या पर्यटकांना फिरण्याचा आणि ट्रेकिंगचा थरारक अनुभव घ्यायचा असेल असे पर्यटक या किल्ल्याला भेट देऊ शकतात. चला तर मग आपण या लेखात हरिहर किल्ल्याविषयी माहिती घेऊ.
ट्रेकिंगचा अनुभव घेण्यासाठी हरिहर किल्ल्याला द्या भेट
हा किल्ला सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगर रांगांमध्ये आणि टेकड्यांच्या सानिध्यात वसलेला आहे. नाशिक जिल्ह्यातील घोटी आणि नाशिक शहरापासून 40 किलोमीटर अंतरावर हा किल्ला असून इगतपुरी पासून 48 किलोमीटर याचे अंतर आहे. जर या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व पाहिले तर हा किल्ला महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणारा गोंडा घाट मार्गे जो काही व्यापार होत होता त्याकडे लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता. पश्चिम घाटमाथ्याच्या त्र्यंबकेश्वर पर्वतावर हा किल्ला असून हा किल्ला यादव वंशात उभारला गेला आहे. म्हणजे साधारणपणे 9 ते 14 व्या शतकाच्या दरम्यान हा किल्ला बांधला गेला असावा असा एक अंदाज आहे.
या किल्ल्याची वैशिष्ट्ये
हरिहर किल्ला जर आपण पर्वताच्या पायथ्यापासून पाहिला तर तो चौरसाकृती दिसतो. परंतु त्याची रचना प्रिझम सारखी असून याची रचना दोन्ही बाजूने शून्य अंश आहे. दुसऱ्या बाजूचा विचार केला तर 75 अंश असून हा 170 मीटर उंचीवर डोंगरावर बांधण्यात आलेला किल्ला आहे. या किल्ल्याचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एक मीटर रुंदीच्या जवळजवळ 117 पायऱ्यांचा वापर करून आपण या किल्ल्यावर पोहोचू शकतो.
या ठिकाणी वरती गेल्यानंतर महादरवाजा हा एक मुख्य दरवाजा असून तो अजूनही अतिशय उत्तम स्थितीत आहे. या गडावर चढताना अर्ध्या रस्त्यापर्यंत अगदी आरामात जाता येते. या डोंगराच्या पायथ्याशी अनेक पायवाटा असून त्या ठिकाणी अनेक जलाशय व विहिरी एकमेकांना जोडण्यात आलेले आहेत. या किल्ल्याच्या शिखरावर पोहोचल्यानंतर पर्यटकांना हनुमान व भगवान शंकराची अनेक छोटी मंदिरे देखील दिसतात.
मंदिरांच्या शेजारी एक लहान तलाव असून त्या ठिकाणचे पाणी अगदी शुद्ध आहे. तलावापासून पुढे गेल्यानंतर दोन खोल्यांचा एक छोटा राजवाडा या ठिकाणी आहे. दहा-बारा लोक या खोलीमध्ये अगदी आरामात राहू शकतात. या ठिकाणहून तुम्ही ब्रह्मा हिल्सचे असे एक सुंदर दृश्य पाहू शकतात. या किल्ल्यावर 1986 मध्ये डग स्कॉट यांनी सर्वप्रथम ट्रेकिंग केली होती. इथला ट्रॅक हा डोंगराच्या पायथ्याशी बांधलेल्या निर्गुंडपाडा या गावातून सुरू होतो.
या किल्ल्याला भेट द्यायची तर कसे जाल?
जर तुमची देखील या किल्ल्याला भेट द्यायची इच्छा असेल तर या ठिकाणी जाण्यासाठी जवळचे आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई असून 170 किलोमीटर लांब आहे. तसेच नाशिक रेल्वे स्टेशन व नासिक विमानतळ साधारणपणे या किल्ल्यापासून 56 किलोमीटर अंतरावर असून कासारा बस स्टॅन्ड 60 किलोमीटर अंतरावर आहे.