Toyota Special Edition:- भारतीय कार बाजारपेठेमध्ये मारुती सुझुकी तसेच महिंद्रा अँड महिंद्रा यासारख्या कंपन्या खूप प्रसिद्ध असून कंपन्यांच्या माध्यमातून आतापर्यंत भारतीय कार बाजारपेठेमध्ये अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्य असलेल्या कार ग्राहकांच्या सेवेशी सादर करण्यात आलेले आहेत.
या कंपन्यासोबतच इतर अनेक कंपन्यांनी देखील भारतीय कार बाजारपेठेमध्ये आपला धबधबा कायम ठेवलेला आहे व त्यातीलच एक कार उत्पादक कंपनी जर आपण बघितली तर जपानी ऑटोमोबाईल उत्पादक टोयोटा कंपनीचे नाव यामध्ये अग्रक्रमाने घ्यावे लागते.आतापर्यंत या कंपनीने भारतीय कार बाजारपेठेमध्ये हॅचबॅक ते एसयुव्ही सेगमेंट पर्यंतची अनेक वाहने सादर केलेली आहेत.
याचाच पुढचा भाग म्हणून आता टोयोटा कंपनीने तीन कारचे लिमिटेड एडिशन सध्या लॉंच केले असून यामध्ये टोयोटा ग्लान्झा, टोयोटा टेसर आणि टोयोटा हायराईड या कारचा समावेश आहे. विशेष म्हणजे या कार खरेदीवर वर्षभराच्या सवलती आणि कंपनीच्या अस्सल ॲक्सेसरीज पॅकेज देखील देण्यात येणार आहे.ग्राहकांना टोयोटा देत आहे या तीन कारवर एक लाख रुपये पेक्षा जास्त बचत करण्याची संधी
टोयोटा कंपनीने टोयोटा ग्लान्झा, टेसर आणि हायराइड या तीन कारचे लिमिटेड एडिशन लॉन्च केले असून या कारसोबत टोयोटा कंपनीचे अस्सल ॲक्सेसरीज पॅकेज आणि वर्षभराच्या सवलती देखील मिळणार आहेत. तसेच या लिमिटेड एडिशन व्यतिरिक्त कंपनी आपल्या तीन कारवर एक लाख रुपयापेक्षा जास्त पैशांची बचत करण्याचे सुवर्णसंधी ग्राहकांना उपलब्ध करून देत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या दिवाळी सारख्या सणाच्या निमित्ताने टोयोटा कंपनीने सादर केलेल्या फेस्टिवल लिमिटेड एडिशनला देखील ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला व त्यामुळे आता या टोयोटा कंपनीने स्पेशल लिमिटेड एडिशन लाईनअप वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू ठेवणार असल्याचा निर्णय घेतला आहे.
या तीन कारच्या लिमिटेड एडिशन करण्यात आल्या लाँच
1- टोयोटाची स्पेशल लिमिटेड एडिशन ग्लान्झा- ही चार चाकी प्रत्येक रेंजमध्ये उपलब्ध असून कंपनी यासोबत नवीन ॲक्सेसरीज पॅकेज देत आहे व या पॅकेज मध्ये फ्रंट बंपर गार्निश, फेंडर क्रोम फिनिश, अतिरिक्त बंपर कॉर्नर प्रोटेक्टर व रियर बंपर क्रोम इन्सर्ट देत आहे व याशिवाय डोअर व्हिझर्स, ORVMs वर क्रोम गार्निशिंग व थ्रीडी फ्लोअर मॅट सुद्धा यामध्ये मिळणार आहे.
2- टोयोटा स्पेशल लिमिटेड एडिशन टेसर- टोयोटा स्पेशल लिमिटेड टेसर दोन मीटर्स एसयूव्ही ही E, S, आणि S+ या व्हेरियंट मध्ये उपलब्ध आहे. परंतु हे एडिशन सीएनजी ट्रिमवर मात्र उपलब्ध नाही. या लिमिटेड एडिशन टेसरला ट्विक केलेले हेडलाईट, फ्रंट ग्रील तसेच स्पृस अप बॉडी कव्हर तसेच इलुमीनेटेड डोअर सील गार्ड, फ्रंट व रियर बंपर कॉर्नर गार्निश, रूफ एक्सटेंन्ड स्पॉयलर, केबिन व बूटसाठी टोयोटा थ्रीडी फ्लोअरमॅट्स देण्यात आले आहेत.
3- टोयोटा स्पेशल लिमिटेड एडिशन हायरायडर- टोयोटा स्पेशल लिमिटेड एडिशन हाय रायडर या गाडीला तेरा ॲक्सेसरीज दिल्या जाणार आहेत. जसे की हाय रायडर मडफ्लॅप, डोअर व्हिजर, ऑल वेदर फ्लॉवर मॅट्स, फ्रंट व रियर बंपर गार्निश, हेडलॅम्प गार्निश व हूड एम्बलम इत्यादी ॲक्सेसरीजचा समावेश आहे. तसेच या व्यतिरिक्त फेंडर गार्निश, बॉडी क्लेडींग, रियर डोअर लीड गार्निश, रूम लॅम्प तसेच डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर व क्रोम फिनिश डोअर हँडल्स इत्यादी ॲक्सेसरीज देखील देण्यात येणार आहे.