स्पेशल

विविध शेती कामे करण्यासाठी ‘हा’ ट्रॅक्टर ठरणार वरदान ! किंमतही आहे परवडणारी, वाचा….

Tractor News : जर तुम्हीही शेतकरी असाल किंवा शेतकरी कुटुंबातील असाल तर आजचा हा लेख तुमच्यासाठी विशेष फायदेशीर ठरणार आहे. विशेषता शेती करण्यासाठी मजबूत आणि चांगला स्वस्त टिकाऊ ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल, तर हा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचे मार्गदर्शनाचे काम करणारा राहणार आहे.

खरंतर गेल्या काही दशकात शेतीमध्ये ट्रॅक्टरचा वावर वाढला आहे. आता बैलजोडीची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. शेतीची सर्वच कामे करण्यासाठी आता ट्रॅक्टरचा सर्रास वापर केला जातो. विशेष बाब म्हणजे ट्रॅक्टरच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत झाली आहे शिवाय उत्पादनात वाढ होत आहे. 

हे पण वाचा :- अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक; ‘या’ शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नुकसान भरपाई !

अशा परिस्थितीत जर आपणही शेती काम करण्यासाठी ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी फार्मट्रॅक कंपनीचा ट्रॅक्टर एक चांगला पर्याय सिद्ध होऊ शकतो.

फार्मट्रॅक 60 पॉवरमॅक्स हा फार्मट्रॅक कंपनीचा ट्रॅक्टर शेतीकामासाठी एक चांगला पर्याय म्हणून अलीकडे शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय बनला आहे. भारतीय शेतकऱ्यांमध्ये हा ट्रॅक्टर स्वतःची वेगळी ओळख बनवत आहे.

या कंपनीच्या ट्रॅक्टरवर शेतकऱ्यांचा प्रचंड विश्वास आहे. Farmtrac 60 Powermax हा नवीन तंत्रज्ञानाचा ट्रॅक्टर आहे. हे कृषी क्षेत्रातील त्याच्या अपवादात्मक कामगिरीसाठी ओळखले जाते.

विशेष म्हणजे या ट्रॅक्टरचे डिझाईन हे खूपच आकर्षक असून शेतकऱ्यांच्या पसंतीसं हा ट्रॅक्टर खरा उतरला आहे. दरम्यान आज आपण या ट्रॅक्टर संदर्भात सर्व आवश्यक माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- कारल्याच्या ‘या’ जातीची लागवड करा; विक्रमी उत्पादन मिळणार !

इंजिन आणि विशेषता 

Farmtrac 60 Powermax हा 55 HP क्षमतेचा शक्तिशाली ट्रॅक्टर आहे. यात 3 सिलिंडर आणि RPM 2000 रेट केलेले इंजिन आहे. तसेच यात PTO HP 49 आहे. फार्मट्रॅक 60 पॉवरमॅक्स ट्रान्समिशनमध्ये सिंगल ड्युअल/स्वतंत्र क्लच आणि 16 फॉरवर्ड + 4 रिव्हर्स गीअर्स आहेत.

हा ट्रॅक्टर ऑइल इमर्स्ड ब्रेक्ससह येतो, जे त्याला मजबूत पकड ठेवण्यास मदत करतात. तसेच, या ट्रॅक्टरचा कमाल वेग पुढील दिशेने 2.4 ते 34.8 किमी प्रतितास आणि उलट दिशेने 3.5 ते 15.8 किमी प्रतितास आहे. हा एस्कॉर्ट ट्रॅक्टर गुळगुळीत पॉवर स्टीयरिंग आणि 60 लिटर डिझेल टाकी क्षमतेसह येतो.

फार्मट्रॅक 60 पॉवरमॅक्स ट्रॅक्टरची भारतीय बाजारपेठेतील किंमत शेतकऱ्यांच्या बजेटनुसार आहे. ही कंपनी शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून आपले ट्रॅक्टर बनवते.

त्यामुळे फार्मट्रॅक 60 पॉवरमॅक्स ट्रॅक्टरची किंमत अंदाजे रु.7.20 लाख ते रु.7.55 लाख एवढी ठेवण्यात आली आहे. ही किंमत मात्र एक्स शोरूम प्राईस आहे रोड ऑन प्राईस वेगळी राहणार आहे.

हे पण वाचा :- गुड न्युज आली ! मान्सून केरळात दाखल? भारतीय हवामान विभागाची माहिती, ‘या’ भागात पडणार जोरदार पाऊस

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts