Ahmednagar Pune Highway : अहमदनगर पुणे महामार्गाबाबत एक अतिशय महत्त्वाच अपडेट हाती आल आहे. या महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सरकारने एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. खरं पाहता या महामार्गावरील वाहतूक कोंडी ही प्रवाशांसाठी कायमच चिंतेचा विषय राहिली आहे.
यामुळे खासदार अमोल कोल्हे आणि शिरूर हवेलीचे आमदार एडवोकेट अशोक बापू पवार यांनी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाघोली ते शिरूर दरम्यान रस्त्याच्या विस्तारिकरणाच्या कामासाठी पाठपुरावा केला होता. दरम्यान आता याची दखल घेण्यात आली असून वाघोली ते शिरूर दरम्यान दुमजली पुलासह 18 पदरी रस्त्याचे काम सुरू होणार आहे.
याबाबत स्वतः केंद्रीय सडक आणि परिवहन मंत्री यांनी नियोजन आखले आहे. नुकत्याच अहमदनगर येथील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाप्रसंगी नितीन गडकरी आले असता त्यांनी या रस्त्याचा उल्लेख केला होता. दरम्यान आता वाघोली ते शिरूर दरम्यान 56 किलोमीटरचा दुमजली पुलासहं अठरा पदरी रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. यामुळे वाघोली, कोरेगाव भीमा, शुक्रापूर या ठिकाणी वाहतूक कोंडी कमी होणार असल्याचा दावा केला जात आहे.
वाघोली ते शिरूर दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून 56 किलोमीटर लांबीचा दुमजली पुलासह 18 पदरी रस्ता बांधला जाणार आहे. याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः केली आहे. या होऊ घातलेल्या मार्गात एकुण तीन मार्ग राहणार आहेत. यातील जमीनीवरील रस्ता 6 पदरी असणार आहे, त्यावर दुमजली पूल उभारला जाणार असून या पुलावरही प्रत्येकी 6-6 लेन राहणार आहेत.
म्हणजेच या महामार्गावरील हा रास्ता एकुण 18 पदरी बनवला जाणार आहे. दरम्यान या महामार्गामुळे फक्त वाहतूक कोंडीच आटोक्यात येईल असं नाही तर पुणे ते शिरुर आणि शिरुर ते अहमदनगर हे अंतर देखील आता लक्षणीय कमी होणार आहे. साहजिकच यामुळे या महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या मार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पूर्णत्वास नेले जात आहे. यामुळे प्राधिकरणाकडून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) निवडीसाठीच्या निविदा प्रक्रीयेला मंजूरी देखील मिळाली आहे. तसेच पीएमसी निवडीसाठीची निविदा प्रक्रीया देखील पूर्ण झाली आहे. या मार्गामुळे परिसरातील वाहतुक अधिक गतिमान होणार असून विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे या मार्गाकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.