Tur Crop Management : यंदा मान्सूनचे आगमन उशिराने होणार असल्याचा अंदाज आहे. मात्र मानसून आगमन झाल्यानंतर शेतकरी बांधव खरीप हंगामासाठी पुढे सरसावणार आहेत. खरीप हंगामात सोयाबीन, मका, तूर, कापूस यांसारख्या नगदी पिकांची शेती शेतकरी करणार आहेत.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार तुरीला या हंगामात चांगला विक्रमी दर मिळाला असल्याने येणाऱ्या खरिपामध्ये तुरीची लागवड वाढणार आहे. निश्चितच तूर एक प्रमुख कडधान्य पीक असून याच्या शेतीतून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देखील मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मात्र असे असले तरी या प्रमुख कडधान्य पिकाच्या शेतीतून अधिकचे उत्पादन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना संतुलित मात्रांमध्ये खत द्यावे लागणार आहे. इतर कोणत्याही पिकाच्या चांगल्या दर्जेदार उत्पादनासाठी ज्या पद्धतीने खतांची मात्रा योग्य वेळी देणे आवश्यक असते तसेच तुर पिकातून देखील चांगले उत्पादन मिळवण्यासाठी तुर पिकाला योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खत देणे आवश्यक आहे.
दरम्यान, आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी तुर पिकाला कोणत्या वेळी कोणती खते किंवा अन्नद्रव्याचा, पोषक घटकांचा पुरवठा केला पाहिजे या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेऊन हजर झालो आहोत.
हे पण वाचा :- ये रे ये रे पावसा….! मान्सून पुन्हा लांबणीवर; महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी होणार मान्सूनचे आगमन, वाचा हवामान विभागाचा अंदाज
असं करा खत व्यवस्थापन
जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे, तूर या प्रमुख कडधान्य पिकासाठी शिफारसीच्या १२५ टक्के नत्र (३१.२५ किलो / हेक्टरी), १०० टक्के स्फुरद (५० किलो /हेक्टरी फॉस्फोरिक आम्लाच्या माध्यमातून) आणि १०० टक्के पालाश (३०किलो/हेक्टरी) पाच वेळा विभागून दिले पाहिजे.
कृषी तज्ञांनी देखील असाच सल्ला शेतकऱ्यांना यावेळी दिला आहे. दरम्यान, आता आपण पीक लागवडीवेळी आणि लागवड केल्यानंतर कितव्या दिवशी किती प्रमाणात खत द्यावे लागणार आहे या संदर्भात जाणून घेणार आहोत.
हे पण वाचा :- सावधान ! अरबी समुद्रात तयार होतंय बायपरजॉय चक्रीवादळ; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात वादळी पाऊसाचा धोका, हवामान विभागाचा इशारा
कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांनी तूर पिकाच्या पेरणी वेळी 10% टक्के शिफारशीत एनपीके अर्थातच नत्र, स्फुरद आणि पालाश दिले पाहिजे. यानंतर पेरणी केल्यानंतर 40 दिवसांनी शेतकऱ्यांनी 20% शिफारशीत एनपीके अर्थातच नत्र, स्फुरद आणि पालाश दिले पाहिजे.
यानंतर पुन्हा पेरणी केल्यानंतर 60 दिवसांनी 20% शिफारशीत एनपीके अर्थातच नत्र, स्फुरद आणि पालाश दिले पाहिजे. मग पेरणीनंतर 80 दिवसांनी 25% शिफारशीत एनपीके दिले पाहिजे. मग पेरणीनंतर शंभर दिवसांनी 25% शिफारसीत एनपीके दिले पाहिजे. अशा पद्धतीने खत व्यवस्थापन केल्यास शेतकऱ्यांना तुर पिकातून हेक्टरी 40 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवता येऊ शकते असा दावा केला जात आहे.