स्पेशल

शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी! तुरीचे दर 11000 वर पोहोचतात केंद्र शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, दरात घसरण होण्याची दाट शक्यता

Tur Rate : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी महत्त्वाची आणि अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे तुरीच्या दराने 11,000 रुपयाचा पल्ला गाठताच केंद्र शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

केंद्र शासनाने तुरीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आता हालचाली तेज केल्या आहेत. खरंतर गेल्या काही दिवसांपासून तुरीच्या दरात सातत्याने तेजी पाहायला मिळाली आहे. राज्यातील प्रमुख तुर उत्पादक जिल्ह्यांमध्ये तुरीचे दर 11000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गेल्या दोन महिन्यांमध्ये तुरीचे दर राज्यातील जवळपास सर्वच बाजारात दहा हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक आहेत.

गेल्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये तुरीच्या दरात 2300 प्रतिक्विंटल एवढी मोठी विक्रमी वाढ नमूद करण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी राज्यातील प्रमुख बाजारात तुरीला 7700 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळत होता.

हे पण वाचा :- पंजाब डख सुधारित मान्सून अंदाज 2023 : 3 जून पासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार ; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात कोसळणार धो-धो पाऊस !

मात्र आता तुरीचे दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक आहेत. यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असून तुरीच्या पिकातून चांगले उत्पन्न मिळण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र आता केंद्रातील मोदी सरकारने तुरीचे दर नियंत्रणात आणण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केले आहेत.

सर्वसामान्य जनतेला तूर कमी दरात उपलब्ध व्हावी म्हणून शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. आता केंद्र शासनाच्या माध्यमातून तुरीच्या साठ्यांवर निर्बंध आणले गेले आहेत. यामुळे थोडे दिवस तुरीच्या दरात घसरण पाहायला मिळाली मात्र आता पुन्हा एकदा तुरीचे दर तेजीत आले आहेत.

बाजार अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा भारतासह संपूर्ण जगात तुरीच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. उत्पादनात घट झाली असल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नाहीये परिणामी दरात तेजी आहे.

हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी ! तलाठी भरती निघाली; 4625 रिक्त तलाठ्यांची पदे भरली जाणार, केव्हा होणार परीक्षा? वाचा….

मात्र आता तुरीचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र शासनाने तुरीच्या साठ्यावर निर्बंध आणले आहेत. याचे आदेश देखील जिल्हा पातळीवर पोहोचले आहेत.

या निर्णयानुसार मोठ्या व्यापाऱ्यांना 200 टन पर्यंत तुरीचा साठा करता येणार आहे तसेच लहान व्यापाऱ्यांना पाच टन पर्यंत तुरीचा साठा करता येणार आहे. निश्चितच तुरीच्या साठ्यावर निर्बंध लावण्यात आले असल्याने याचा परिणाम म्हणून तुरीचे दर कमी होऊ शकतात असे सांगितले जात आहे.

तर काही बाजार अभ्यासकांनी तुरीचे उत्पादन खूपच कमी झाले असल्याने तुरीचे दर कमी होणार नाहीत असं सांगितलं आहे. यामुळे आता केंद्र शासनाचा हा निर्णय तुरीचे दर कमी करतो की दर असेच तेजीत राहतात हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

हे पण वाचा :- दिलासादायक ! महिला शेतकऱ्यांच्या अपघाती मृत्यूनंतर वारसाला मिळणार ‘इतक्या’ लाखांचे अनुदान; योजनेचे स्वरूप, पात्रता, कागदपत्राविषयी वाचा….

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts