नगरला २ हेलिकाँप्टर आले अन् माना उंचावल्या, परवानगी, किंमत, पहा, हेलिकाँप्टरची सगळी माहिती — मित्रांनो, आज आपण जरा वेगळ्या विषयावर बोलूया.. विषय आहे हेलिकाँप्टरचा. गेल्यावर्षी लोकसभा व त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अगदी खेड्यापाड्यात हेलिकाँप्टर दिसली. आजही आकाशातून आवाज आला की, आपली पिढी आपसूक मान वर करते. एवढंच कशाला, पोरं-सोरंच नाही तर, अगदी म्हातारी-कोतारी माणसंही थेट घराबाहेर येऊन डोळ्यावर हात लावून हेलिकाँप्टर कुतुहलाने पाहतात. आता याच हेलिकाँप्टरची पुन्हा चर्चा सुरु झालीय. गेल्या महिन्यात राहुरी येथील एका उद्योजकाने स्वतः हेलिकाँप्टर खरेदी केलं.
तर दोन दिवसांपूर्वी नगरचे माजी महापौर संदीप कोतकर कुटुंबाने दुसरं हेलिकाँप्टर खरेदी केलं. एकाच महिन्यात अहिल्यानगर जिल्ह्यात दोन खासगी हेलिकाँप्टर आले आणि पुन्हा चर्चा सुरु झाली. हेलिकाँप्टर घेणं ही साधी गोष्ट नाही. इथं सामान्यांना टु-व्हिलर, फोर-व्हिलर घ्यायला नाकी नऊ येतात, तिथं हेलिकाँप्टर घेणं त्याचा मेंटेनन्स ठेवणं, मोठ्या जिकरीचं काम असतं. त्याच्या पायलटलाच महिन्याला ४० हजार ते दीड लाख पगार द्यावा लागतो. एक हेलिकाँप्टर घेणं, म्हणजे ५० हत्ती पाळण्यासारखं आहे. हेलिकाँप्टर केवढ्याला येतं..? खरेदीसाठी काय करावं लागतं..? मेटेनन्स कसा असतो..? पायलटला पगार किती असतो..? परवानग्या कशा घ्याव्या लागतात..? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न.
मित्रांनो, Eurocopter EC225 Super Puma हे जगातील सर्वात महागडे नागरी हेलिकॉप्टर आहे. हे हेलिकॉप्टर दोन पायलट आणि एक केबिन क्रूसह 24 प्रवाशांसह उड्डाण करू शकते, त्याची किंमत 190 कोटी रुपये आहे. तर भारतातील सर्वात स्वस्त हेलिकाँप्टर हे, रॉबिन्सन R-22 आहे. त्याची किंमत 2,50,000 यूएस डाँलर म्हणजेच 1 कोटी 71 लाख 23 हजार 750 रुपये आहे. हे हेलिकॉप्टर जगातील सर्वात लोकप्रिय आणि स्वस्त हेलिकॉप्टर आहे. भारताचा विचार केला तर भारतात सुमारे २५० खासगी हेलिकाँप्टरची नोंदणी आढळते. सैन्यदलाबाबत बोलायचे झाल्यास भारताच्या तिन्ही सैन्यदलाकडे १८७ चेतक हेलिकाँप्टर व २०५ चित्ता हेलिकाँप्टर आहेत. हेलिकाँप्टर हे एका तासांत २०० ते ३०० किलोमिटर प्रवास करु शकतात.
मित्रांनो, सुरुवातीला आपण हेलिकाँप्टरची किंमत किती असते, ते पाहू… हेलिकॉप्टरची किंमत ते किती सीटर आहे आणि ते कोणत्या मॉडेलचे आहे यावर अवलंबून असते . हेलिकॉप्टर, हेलिकॉप्टर , एअरबस असे अनेक प्रकार त्यात असतात. याशिवाय चार सिटर, सहा सिटर, आठ सिटर, दहा सिटर आसन क्षमतेचेही हेलिकाँप्टर असतात. आपण लक्झरी एअरबसबद्दल बोललो तर त्यांची किंमत 100 कोटी रुपयांपर्यंत असू शकते . तर 2-4 सीटर हेलिकॉप्टर देखील 10 कोटी रुपयांपर्यंत खरेदी करता येतात. राँबिन्सन आर-२२ या हेलिकाँप्टरबद्दल बोलायचे झाल्यास त्याची किंमत १ कोटी ८४ लाख रुपये आहे. हे हेलिकाँप्टर सर्वात स्वस्त व लोकप्रिय आहे. दुसरीकडे भारतीय बाजारपेठेत चार सिटर हेलिकाँप्टरची किंमत २ कोटी ३० लाखही आहे. सहा सिटर हेलिकाँप्टरची किंमत दोन कोटी ८० लाख रुपये आहे.
आता हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी कोणते नियम लागतात ते आपण पाहू… हेलिकॉप्टर कोणीही खरेदी करू शकते. मात्र त्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक असते. डीजीसीएने यासाठी काही नियम बनवले आहेत . जर तुम्हाला हेलिकॉप्टर घ्यायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल. तेथून मंजुरी मिळाल्यानंतरच कंपनीकडून हेलिकॉप्टर खरेदी करता येते. त्यानंतर भारत सरकारच्या नागरी उड्डयन मंत्रालयाची परवानगीही त्यासाठी घ्यावी लागते. त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर अगोदर अप्लाय करावा लागतो. त्यांची एनओसी घेतल्यानंतर आधारकार्ड, वोटर आयडीकार्ड, पॅनकार्ड, इन्कम टॅक्स प्रुफ आदी कागदपत्रे देऊन पुढची प्रक्रिया करता येते. जर तुम्हाला परदेशातून हेलिकॉप्टर मागवायचे असेल, तर IEC देखील आवश्यक आहे , त्यानंतर तुम्ही DGCA मार्फत अर्ज करू करावा लागतो.
याशिवाय तुम्हाला हेलिकाँप्टर खरेदी करताना तुमच्याकडे योग्य पायलट आहे, याचाही प्रुफ जोडावा लागतो. हेलिकाँप्टर खरेदी केल्यावर त्याची काळजी, सुविधा, लँन्डींग या सर्व पर्यायांचा प्रुफही द्यावा लागतो. पायलटला किती असतो पगार ते आपण पाहू… हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी तुम्हाला ते चालवायला शिकणे आवश्यक आहे असे नाही , परंतु हेलिकॉप्टर चालवणाऱ्या व्यक्तीकडे हेलिकॉप्टर खाजगी पायलट परवाना असणे आवश्यक आहे. याशिवाय ते खरेदी केल्यानंतर ते उडवण्याबाबत अनेक नियम पाळावे लागतात आणि हेलिकॉप्टर उडवण्यासाठी जिल्हाधिकारी व इतर जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक असते. लोक हेलिकॉप्टर भाड्याने घेतात तेव्हाही त्याची माहिती आधी जिल्हा प्रशासनाला द्यावी लागते, त्यानंतरच हेलिकॉप्टर उडवता येते. आता हे हेलिकाँप्टर उडविण्यासाठी प्रशिक्षित पायलट आवश्यक असतो.
या पायलटचा महिन्याचा पगार हा ४० हजारांपासून दीड लाखांपर्यंत असतो. वास्तविक हा पगार त्याच्या अनुभवावर ठरतो. एका उड्डाणासाठी थेट ४० हजार ते ७० हजार घेणारे खासगी पायलटही मिळतात. याशिवाय तुम्हाला खासगी हेलिपॅडवर लॅन्डींग करायचे असल्यास त्याचे चार्जही वेगळे असतात. ते ३० हजारांपासून ५० हजारांपर्यंत असतात. मेन्टनन्स कसा असतो, तेही आपण पाहू… टू व्हिलर किंवा फोर-व्हिलरला जशी मेन्टेनन्स, सर्विसींगची आवश्यकता असते तशीच ती हेलिकाँप्टरलाही असते. हेलिकाँप्टरच्या मालकाला मेन्टेनन्स रिपेअर अँण्ड ऑपरेशन म्हणजेच एमआरओ नेमावा लागतो. एमआरओची सेवा देणाऱ्या खासगी कंपन्याही असतात. त्यांना वर्षाला १० ते १५ लाख रुपये द्यावे लागतात.