Uddhav Thackeray News : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले घवघवीत यश प्राप्त झाले आहे. यामुळे महाविकास आघाडी मधील सर्वच घटक पक्ष कमालीचे गदगद झाले आहेत. महाविकास आघाडी मधील सर्वच पक्षांच्या नेत्यांचा कॉन्फिडन्स आता चांगलाच वाढला आहे. दरम्यान येत्या काही दिवसांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.
त्यामुळे येत्या निवडणुकीतही लोकसभा निवडणुकीचीच पुनरावृत्ती घडवून आणण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून केला जाणार आहे. पण, महाविकास आघाडी कडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण राहणार ? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
राजकीय विश्लेषकही महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून कोणाचे नाव पुढे करते याकडे विशेष लक्ष ठेवून आहे. महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी उपस्थित केली होती.
स्वतः उद्धव ठाकरे यांनीच आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी केली होती. परंतु शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने या संदर्भात वेगळी भूमिका घेतलेली आहे. महाविकास आघाडी कडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण राहणार हे गुलदस्त्यातच ठेवायचं अशी भूमिका या दोन्ही पक्षांनी घेतलेली आहे.
पण, यामुळे ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर पडलेत की काय ? अशा चर्चा सध्या राजकारणाच्या गल्लीबोळात पाहायला मिळत आहेत. दरम्यान, आता महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण राहणार? यासंदर्भात स्वतः राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठ भाष्य केलं आहे.
ठाकरे यांनी, “मी माजी मुख्यमंत्री आहे. माझे मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न तेव्हाही नव्हते अन आता सुद्धा मुळीच नाही. जनता हीच माझी सत्ता आहे. या सत्तेतून मी कधीही निवृत्त होणार नाही. मला कीणीही निवृत्त करू शकत नाही,” असे भाष्य केले आहे.
काल अर्थातच 15 सप्टेंबर 2024 ला जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने महा अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. हे अधिवेशन अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावात संपन्न झाले. याच अधिवेशनाला राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली होती.
यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत आपली भूमिका जगजाहीर केली आहे. दरम्यान, ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर आता महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार नाहीत का ? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.