Undersea Tunnel : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर देशभरात वेगवेगळी रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. सोबतच बुलेट ट्रेन सारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प देखील सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा समावेश होतो.
हा प्रकल्प दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जात आहे. या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत बीकेसी ते शिळफाटा या 35 किलोमीटरच्या अंतरात एकूण 21 किलोमीटर लांबीचा देशातील पहिला-वहिला समुद्राखालील बोगदा देखील तयार केला जाणार आहे.
हा बोगदा ठाण्याच्या खाडीखालून प्रस्तावित करण्यात आला आहे. हा समुद्राखालील भूमिगत बोगदा एफकोन्स कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या माध्यमातून पूर्ण केला जाणार आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो, सर्पदंश झाला तर घाबरू नका, ‘हे’ काम करा; पण सापाने चावा घेतल्यास ‘या’ गोष्टी करणे टाळा, नाहीतर….
या कंपनीने या बोगद्याचे टेंडर जिंकले असून नुकतेच या करारावर नॅशनल हाय स्पीड कॉर्पोरेशनच्या माध्यमातून सह्या करण्यात आल्या आहेत. यासाठी जवळपास 6,397 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हे काम येत्या पाच वर्षात पूर्ण केले जाणार आहे.
अर्थातच 2028 पर्यंत समुद्राखालील पहिला बोगदा तयार होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या 21 किलोमीटर लांबीच्या बोगद्यापैकी सात किलोमीटर लांबीचा बोगदा हा ठाणे खाडी खालून जाणार आहे.
मुंबईच्या विक्रोळी ते नवी मुंबईच्या घनसोली दरम्यान हा बोगदा विकसित होणार आहे. हा बोगदा ठाणे खाडीखाली 40 मीटर खोल राहणार आहे तर पारसिक डोंगराखाली 110 मीटर खोली याची राहणार आहे.
हे पण वाचा :- धक्कादायक ! महाराष्ट्र पुन्हा हादरला; पाच महिन्यातील शेतकरी आत्महत्येची ‘ही’ आकडेवारी काळीज पिळवटणारी, शासन केव्हा जाग होणार?
या बोगद्याचा व्यास 13.1 मीटर राहणार असून हा बोगदा जमिनीखाली 25 ते 40 मीटर खोल राहील. खरंतर मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा संपूर्ण मार्ग हा उन्नत आहे. मात्र या प्रकल्पांतर्गत हा 21 किलोमीटरचा मार्ग भूमिगत राहणार आहे.
दरम्यान, या बोगद्यासाठी काढण्यात आलेल्या टेंडरवर आणि याच्या करारावर नॅशनल हायस्पीड कॉर्पोरेशनच्या माध्यमातून नुकत्याच सह्या करण्यात आल्या असल्याने या बोगद्याच्या कामाला येत्या काही महिन्यात सुरुवात होणार आहे. यामुळे आता या बोगद्याचे काम नेमके केव्हा सुरू होते आणि हा बोगदा पूर्ण केव्हा होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.
हे पण वाचा :- महाराष्ट्रात यंदाच्या पावसाळ्यात ‘या’ वेळी पडणार जोरदार पाऊस ! पंजाब डख यांनी तारीखच सांगितली