स्पेशल

एसबीआय आणि एचडीएफसीपेक्षा युनियन बँकेची एफडी फायदेशीर ! 400 दिवसाच्या FD मध्ये 5 लाख गुंतवलेत तर किती रिटर्न मिळणार ?

Union Bank FD Scheme : जर तुम्ही ही नजीकच्या काळात एफडी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आजचा लेख कामाचा ठरणार आहे. आज आपण युनियन बँकेच्या एफडी बाबत माहिती पाहणार आहोत. युनियन बँकेच्या चारशे दिवसांच्या एफ डी मधून किती परतावा मिळू शकतो, युनियन बँकेच्या 400 दिवसांच्या एफडीचे व्याजदर कसे आहेत याबाबत आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

खरंतर अलीकडे एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. इतर कोणत्याही बचत योजनांपेक्षा एफ डी मधून अधिकचा परतावा मिळत असल्याने या ठिकाणी गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

महिला वर्ग देखील आता मोठ्या प्रमाणात फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करत आहे. अशा परिस्थितीत जर तुमचाही एफडी करण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी युनियन बँकेचा पर्याय हा फायदेशीर ठरू शकतो.

दरम्यान आज आपण युनियन बँकेच्याचारशे दिवसांच्या एफडी योजनेत पाच लाखाची गुंतवणूक केली तर ग्राहकांना किती रिटर्न मिळणार याचे संपूर्ण कॅल्क्युलेशन समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

युनियन बँकेची चारशे दिवसांची एफडी योजना

युनियन बँक ही देशातील पब्लिक सेक्टर मधील एक प्रमुख बँक आहे. ही बँक सात दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधीची एफडी ऑफर करते. ही बँक वेगवेगळ्या कालावधीच्या एफडी वर ग्राहकांना 3.50% पासून ते 7.25% रेटने व्याज देते.

युनियन बँकेच्या चारशे दिवसाच्या एफडी बाबत बोलायचं झालं तर या एफ डी वर सामान्य ग्राहकांना 6.60% आणि जेष्ठ नागरिक ग्राहकांना 7.10% या रेटने व्याज दिले जात आहे.

5 लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?

या एफडी योजनेत जर सामान्य ग्राहकांनी पाच लाख रुपये गुंतवले तर त्यांना मॅच्युरिटीवर म्हणजेच 400 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पाच लाख 33 हजार रुपये मिळणार आहेत. अर्थातच सामान्य ग्राहकांना या एफ डी योजनेतून 33 हजार रुपयांचे रिटर्न मिळणार आहेत.

जर याच कालावधीच्या एफडी योजनेत जेष्ठ नागरिक ग्राहकाने पाच लाख रुपये गुंतवले तर त्यांना पाच लाख 35 हजार पाचशे रुपये मिळणार आहेत. अर्थातच 35 हजार पाचशे रुपये त्यांना रिटर्न म्हणून दिले जाणार आहेत.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts