स्पेशल

तंत्रज्ञानाचा वापर करत ‘हा’ शेतकरी केळी पासून घेतो 70 लाखाचे उत्पन्न! नेमके कसं केले या शेतकऱ्याने शक्य?

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा शेती क्षेत्रासाठी खूप महत्वाचा ठरला असल्याने तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकरी पिकांपासून भरघोस उत्पादन घेऊ लागले आहेत व त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न देखील मिळवत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि भाजीपाला तसेच फळ पिकांच्या लागवडीच्या माध्यमातून शेतकरी आता खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्रगती साधत असून शेतीक्षेत्र देखील आता एक व्यावसायिक हब म्हणून पुढे आलेले आहे.

काही काही शेतकरी तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक अशक्य गोष्टी शेतीमध्ये शक्य करताना आपल्याला दिसून येत आहेत. याच आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने गुजरात राज्यातील धीरेंद्रकुमार भानुभाई नावाचे शेतकरी

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने 26 महिन्याच्या कालावधीत तीन वेळा केळीचे उत्पादन घेतात व महत्त्वाचे म्हणजे हे असे करणारे भारतातील एकमेव शेतकरी ठरले असून त्यांना मॅलिक बुक ऑफ रेकॉर्ड्स मधून शेती क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार देखील मिळाला आहे.

 केळी पिकामध्ये जपला वेगळेपणा

साधारणपणे केळी पिकाचा जर आपण कालावधी पाहिला तर तो 14 ते 16 महिन्याचा आहे. परंतु धिरेंद्र कुमार यांनी मात्र तंत्रज्ञानाचा वापर करत 26 महिन्याच्या कालावधीत तब्बल तीन वेळा केळीचे पीक घेतले आहे आणि हेच वेगळेपण त्यांनी इतर केळी उत्पादक शेतकऱ्यांपेक्षा केलेले आहे.

एवढेच नाही तर त्यांनी केळीची निर्यात देखील केली असून या सगळ्या केळी व्यवस्थापनामध्ये त्यांनी ऊती संवर्धनापासून तर ठिबक सिंचनाचा वापर आणि एकात्मिक पोषण व्यवस्थापनासारख्या तंत्रांचा वापर केलेला आहे. तसेच अकार्बीक व सेंद्रिय पोषक घटकांचे 70:30 गुणोत्तराचा वापर करत त्यांनी केळीच्या फुलावर प्रयोग करत केळीवर पडणारे विविध प्रकारचे रोग आणि बुरशीचा प्रादुर्भाव देखील कमी केला आहे.

तसेच फवारणी बँगिंग आणि कापणी तंत्राचा वापर केल्यामुळे देखील केळीची गुणवत्ता सुधारण्याचे ते म्हणतात. देवेंद्र कुमार हे आखाती देशांमध्ये केळीची निर्यात करतात व यामध्ये दुबई तसेच अबुधाबी, ओमान आणि सौदी अरेबिया या ठिकाणी प्रामुख्याने त्यांची केळीची निर्यात होते व ते साधारणपणे 2014 पासून केळी निर्यात करत आहेत.

 केळी पिकातून किती आहे आर्थिक उत्पन्न

धीरेंद्र भाई त्यांच्या केळी उत्पादनाच्या माध्यमातून तब्बल वर्षाला 70 लाख एवढे उत्पन्न मिळवत आहेत. मोठ्या मोठ्या आयटी क्षेत्रामध्ये नोकरी करणाऱ्या  व्यक्तींना जितके पैसे मिळणार नाही तितकी कमाई ते शेतीमधून करत आहेत.

ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर कौशल्यपूर्ण रीतीने करणारे शेतकरी म्हणून देखील धिरेंद्र भाई ओळखले जातात. विशेष म्हणजे केळी लागवडीसाठी ड्रोन वापरणारे हे पहिले शेतकरी असतील.

त्यांनी G9 जातीच्या केळीची लागवड केली असून नऊ इंचाच्या आकाराच्या केळीसाठी ही जात ओळखली जाते. ही केळीची जात संपूर्ण भारतात प्रसिद्ध असून तिची मागणी देखील जास्त आहे व यापासून त्यांना प्रति हेक्टर मिळणारा नफा सोळा लाखाच्या पुढे आहे.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पाण्याचे योग्य व्यवस्थापन हे त्यांच्या यशाचे गमक आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करत हेक्‍टरी 16 ते 17 लाख रुपयांचा नफा मिळवल्याने इतर केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील धीरेंद्र भाई एक प्रेरणा ठरतील हे मात्र निश्चित.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts