Vande Bharat EV : वंदे भारत म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे सर्वप्रथम उभे राहत ते वंदे भारत एक्सप्रेस या भारतीय बनावटीच्या ट्रेनचे मनमोहक दृश्य. संपूर्ण भारतीय बनावटीची ही ट्रेन देशात सध्या सर्वाधिक चर्चिली जाणारी एक्सप्रेस ट्रेन आहे.
रेल्वे प्रवाशांमध्ये या गाडीची सध्या क्रेज पाहायला मिळत आहे. गतिमान अन आरामदायी प्रवासामुळे ही गाडी अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली आहे. ही ट्रेन जवळपास 180 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावण्यास सक्षम आहे.
मात्र भारतीय रेल्वे बोर्डाने या गाडीला 130 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावण्यास परवानगी दिली आहे. परंतु सध्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू असलेल्या मार्गावर ही ट्रेन शंभर किलोमीटर प्रतितास या वेगाने धावत आहे.
हे पण वाचा :- गुंतवणूकदारांची झाली चांदी ! ‘हा’ 37 रुपयाचा स्टॉक पोहचला 490 रुपयांवर; वाचा स्टॉकची सविस्तर माहिती एका क्लिकवर
मात्र, वंदे भारत ही फक्त सुपरफास्ट ट्रेनच आहे असे नाही तर वंदे भारत इलेक्ट्रिक वेहिकल देखील आपल्या भारतात सुरू झाल्या आहेत. देशातील ई रिक्षा मार्केटमध्ये आता वंदे भारत नावाने इलेक्ट्रॉनिक थ्री व्हीलर रिक्षा सुरु झाली आहे.
सहानीआनंद ई वेहिकल्स प्रायव्हेट लिमिटेड (Sahnianand E vehicles private limited) या कंपनीने थ्री व्हीलर इलेक्ट्रॉनिक व्हेईकल तयार केले आहे.
या थ्री व्हीलर व्हेईकलला या कंपनीने वंदे भारत असं नाव दिल आहे. या कंपनीची स्थापना 2021 मध्ये झाली असून या कंपनीने अनेक मॉडेलमध्ये वंदे भारत इलेक्ट्रॉनिक व्हेईकल तयार केले आहेत.
हे पण वाचा :- होम लोन घेताय ना ! मग यासाठी कोणती कागदपत्रे लागणार? पहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर
या वंदे भारत इलेक्ट्रॉनिक वेहिकल्स 80 किलोमीटर पर्यंतची रेंज देते. म्हणजेच ही इलेक्ट्रॉनिक थ्री व्हीलर एकदा चार्ज केली तर 80 किलोमीटर पर्यंतचा प्रवास करते.
वंदे भारत थ्री व्हीलर चालवणाऱ्या चालकांनी दिलेल्या माहितीनुसार ही वंदे भारत थ्री व्हीलर एकदा चार्ज करण्यासाठी जवळपास आठ तासांचा कालावधी लागतो.
विशेष म्हणजे या कंपनीच्या वंदे भारत इलेक्ट्रॉनिक थ्री व्हीलरची किंमत एक लाख 45 हजार रुपये एवढी आहे. म्हणजेच ही गाडी रॉयल एनफिल्डच्या बुलेट पेक्षा स्वस्त आहे. निश्चितच ही इलेक्ट्रॉनिक थ्री व्हीलर खाजगी वाहनचालकांसाठी फायदेशीर राहणार आहे.
हे पण वाचा :- जगातील सर्वाधिक लांबीचे रेल्वे प्लॅटफॉर्म हिंदुस्थानात ! गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे नाव, कोणते आहे ते स्टेशनं, पहा