Vande Bharat Express : 10 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई सोलापूर आणि मुंबई शिर्डी या दोन वंदे भारत एक्सप्रेस ला हिरवा झेंडा दाखवला आहे. दरम्यान आज पासून या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. अशा परिस्थितीत आज आपण या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेसच्या विशेषता थोडक्यात जाणून घेणार आहोत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मुंबई-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या घाट सेक्शन मधून धावणार आहेत. मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेन भोर घाटात खंडाळा-लोणावळा विभागात धावणार आहे तर मुंबई शिर्डी ही थळ घाट म्हणजे कसारां घाटातुन जाणार आहे.
इतरही एक्सप्रेस या घाट मार्गातील रेल्वे रुळावर धावत असतात मात्र इतर एक्सप्रेस ला बँकर इंजिन बसवलेलं असतं. या वंदे भारत ट्रेन मात्र बँकर इंजिनशिवाय 37 ग्रेडियंट घाट विभागात वर चढणार आहेत. हेच कारण आहे की या संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ट्रेनचं कौतुक केलं जात आहे.
याशिवाय, या ट्रेनमध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. जसे की, ट्रेनमध्ये ऑटोमॅटिक प्लग दरवाजे, टच-फ्री स्लाइडिंग दरवाजे, एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये फिरणारी जागा, प्रत्येक डब्यात 32 इंच प्रवाशांची माहिती आणि इन्फोटेनमेंट सिस्टम, प्रत्येक डब्यात आपत्कालीन प्रकाश व्यवस्था, आपत्कालीन टॉक-बॅक युनिट्स, जंतूमुक्त हवेच्या पुरवठ्यासाठी अतिनील दिवा, दिव्यांगजन प्रवाशांसाठी विशेष स्वच्छतागृह, बायोव्हॅक्यूम टॉयलेट, चार प्लॅटफॉर्म साइड कॅमेरे, कवच इ. सुविधा आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.