Vande Bharat Express : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता, गेल्या काही महिन्यांपासून राज्यात वंदे भारत एक्सप्रेसची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे. विशेषतः फेब्रुवारी महिन्यापासून राज्यात वंदे भारत एक्सप्रेसची विशेष क्रेझ पाहायला मिळाली आहे.
आपणास ठाऊकच आहे फेब्रुवारी राज्यात सीएसएमटी ते सोलापूर आणि सीएसएमटी ते साईनगर शिर्डी यादरम्यान वंदे भारत ट्रेन सुरु झाली आहे. या दोन मार्गावर सुरू झालेली ही गाडी अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली आहे. या दोन गाड्यांपैकी मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ला प्रवाशांनी अधिक पसंती दाखवली आहे.
अशातच आता राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. विशेष म्हणजे मुंबई आणि कोकणातील रेल्वे प्रवासासाठी ही बातमी खास आहे. कारण की, मुंबईहून-मडगाव दरम्यान लवकरच वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाणार आहे.
निश्चितच मुंबई ते गोवा दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याने याचा पर्यटकांना सर्वाधिक लाभ होणार आहे. यासोबतच कोकणातील चाकरमान्यांना देखील याचा फायदा होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मार्च महिन्यात केंद्रीय रेल्वे महाराजचे मंत्री रावसाहेब दानवे यांनी लवकरच मुंबई ते गोवा दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होईल अशी घोषणा केली होती.
यानंतर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झालेत. आज या मार्गावर वंदे भारत ट्रेनचे चाचणी देखील पूर्ण झाली आहे. यामुळे आता महाराष्ट्राला लवकरच पाचवी वंदे भारत ट्रेन मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. निश्चितच मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही एक मोठी आनंदाची बाब आहे.