Vande Bharat Express Route : नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राला तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळाली. येत्या काही दिवसांनी राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि याच निवडणुका डोळ्यापुढे ठेवून केंद्रातील मोदी सरकार महाराष्ट्रावर मेहरबान आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला आहे.
तसाच फटका विधानसभा निवडणुकीत बसू नये यासाठी महायुती सरकारने सावध भूमिका घेतली आहे. महायुती सरकारच्या पाठपुराव्यामुळेच महाराष्ट्राला नुकत्याच तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळालेल्या आहेत. या वंदे भारत एक्सप्रेस नागपूर ते सिकंदराबाद पुणे ते हुबळी आणि पुणे ते कोल्हापूर या मार्गावर सुरू झाल्या आहेत.
याआधी राज्यात आठ वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत्या. मात्र या वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर ही संख्या 11 वर पोहोचली आहे. महत्त्वाचे म्हणजे आता राज्याला आणखी एक नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन कोल्हापूर ते मुंबई दरम्यान चालवली जाणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मिरज रेल्वे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर ते मुंबई दरम्यान स्वातंत्र वंदे भारत एक्सप्रेस चालवली पाहिजे अशी मागणी उपस्थित केली.
विशेष बाब अशी की रेल्वेमंत्र्यांनी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची ही मागणी ताबडतोब मान्य केली. या मार्गावर तातडीने नवी वंदे भारत ट्रेन सुरू केली जाईल अशी ग्वाही केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दिली. या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून कोल्हापूर-मिरज-सांगली-मुंबईदरम्यान वेगळी ‘वंदे भारत’ देण्याबाबत आग्रही मागणी केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर मिरज रेल्वे कृती समितीने रेल्वे मंत्र्यांपुढे या मार्गावर नवीन वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याची मागणी केली. रेल्वेमंत्र्यांनी या मार्गावर तातडीने नवी गाडी देण्याचे मान्य सुद्धा केले आहे.
त्यामुळे लवकरच कोल्हापूर-मिरज-मुंबई वेगळी ‘वंदे भारत’ रेल्वे सुरू होऊ शकेल अशी शक्यता बळवली आहे. सध्याची आठवड्यातून प्रत्येकी तीन दिवस हुबळी-मिरज-पुणे व कोल्हापूर-मिरज-पुणे धावणाऱ्या दोन वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातुन सहा दिवस हुबळी-पुणे म्हणून धावतील.
म्हणजे हुबळी पुणे आणि कोल्हापूर पुणे ही गाडी एकच होईल. तसेच कोल्हापूर-मिरज-मुंबई ही वेगळी ट्रेन म्हणून चालवण्यास मंजुरी दिली जाऊ शकते. यामुळे नक्कीच कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.