स्पेशल

Vande Bharat Express : ऑक्टोबर महिन्यात ‘या’ मार्गावर सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस !

Vande Bharat Express Train : संपूर्ण भारतीय बनावटीची देशातील पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन म्हणजेच वंदे भारत एक्सप्रेसबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. खरे तर वंदे भारत एक्सप्रेस हिट ठरली आहे. या ट्रेनच्या आगमनामुळे देशातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास हा जलद, सुरक्षित आणि आरामदायी झाला आहे. या ट्रेनमध्ये मिळणाऱ्या सोयीसुविधा प्रवाशांना आवडत आहेत.

म्हणून तिकीट दर अधिक असतानाही या ट्रेनने प्रवास करण्याला पसंती दाखवली जात आहे. हेच कारण आहे की वंदे भारत एक्सप्रेसचे स्लीपर वर्जन आणि वंदे भारत मेट्रो ट्रेन देखील लवकरच रुळावर आणण्यासाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.

वंदे भारत स्लीपर ट्रेन

भारतीय रेल्वे लवकरच वंदे भारत मेट्रो आणि वंदे भारत स्लीपर ट्रेन लॉन्च करणार असल्याची बातमी समोर येत आहे. देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन मुंबई ते बरेली या मार्गावर चालवली जाऊ शकते असा दावा देखील होत आहे.

याशिवाय मुंबई ते दिल्ली, पुणे ते दिल्ली या मार्गावरही वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवण्याचे नियोजन आहे. एवढेच नाही तर दिवाळीच्या आधी भोपाळ येथील राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून मुंबईसाठी वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवण्याचा देखील प्लॅन रेल्वेने तयार केला आहे.

रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा

असे झाल्यास राज्यातील रेल्वे प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. अशातच दिवाळीच्या आधीच देशातील एका महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू होणार अशी माहिती एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेच्या माध्यमातून समोर आली आहे.

ऑक्टोबर महिन्यात आठ कोच असणारी चेरकार प्रकारातील वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन भोपाल ते लखनऊ या मार्गावर चालवली जाईल असे म्हटले जात आहे. भोपाळ येथील राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून ही ट्रेन सुरू केली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे बोर्डाने आठ डब्यांच्या वंदे भारत चेअरकारचे वाटप सुरू केले आहे. यानुसार दिवाळीपूर्वी लखनौ विभागाच्या खात्यात एक वंदे भारत एक्सप्रेस येणार आहे. ही गाडी लखनौ ते भोपाळदरम्यान सुरू होणार आहे.

ऑक्टोबरपासून वंदे भारत ट्रॅकवर

यामुळे लखनऊ ते भोपाळचा प्रवास अधिक जलद होईल अशी आशा आहे. विशेष म्हणजे याबाबतची जवळपास सर्व प्रकारची औपचारिकता पूर्ण झाली आहे. म्हणून ऑक्टोबरपासून वंदे भारत ट्रॅकवर धावताना दिसणार असल्याचे मानले जात आहे.

शहरांत वंदे भारत चालवण्याची तयारी

रेल्वे सातत्याने वंदे भारत गाड्यांची संख्या वाढवत आहे. याच अनुषंगाने लखनौपर्यंत अनेक शहरांतून वंदे भारत चालवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, भोपाळ ते लखनौ या नवीन वंदे भारत ट्रेनला जवळपास मंजुरी मिळाली आहे.

दिवाळीपूर्वी ही ट्रेन चालवली जाणार आहे. भोपाळमध्ये त्याची तयारी जोरात सुरू झाली आहे. मात्र ही ट्रेन लखनऊमध्ये कोणत्या स्थानकावर येणार याबाबत अद्याप परिस्थिती स्पष्ट झालेली नाही. पण, त्याचा आदेश रेल्वे बोर्डाकडून लवकरच जारी केला जाऊ शकतो.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts