स्पेशल

वंदे भारत स्लीपर ट्रेन आहे दुसरी फाइव्ह स्टार हॉटेल! मिळतात भन्नाट सुविधा, धावते ताशी 160 किमी वेगाने

प्रवाशांना आरामदायी आणि वेगात प्रवास करण्याच्या दृष्टिकोनातून वंदे भारत एक्सप्रेस हा एक रेल्वेच्या माध्यमातून अत्याधुनिक असा रेल्वेचा प्रकार देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला असून या माध्यमातून देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढली आहे.

त्यासोबतच प्रवासामधील लागणारा वेळ वाचण्यास देखील मदत झालेली आहे. देशातील जवळपास बऱ्याच ठिकाणी आता वंदे भारत एक्सप्रेस ही सेमी हायस्पीड ट्रेन यशस्वीपणे धावताना  आपल्याला दिसून येत आहे. महाराष्ट्रात देखील ज्या ही मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू आहे त्या ठिकाणी प्रवाशांच्या माध्यमातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

या महत्त्वाच्या असलेल्या वंदे भारत ट्रेन नंतर मात्र आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला रेल्वे रुळावर वंदे भारत स्लीपर ट्रेन धावताना दिसणार आहे.

साधारणपणे येणाऱ्या तीन महिन्यांमध्ये ही वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत असून नुकतेच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बंगलोर येथील भारत अर्थमूव्हर्स लिमिटेड उत्पादन युनिटमध्ये वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या प्रोटोटाईपचे अनावरण केले आहे.

 काय आहेत या वंदे भारत स्लीपर  ट्रेनची वैशिष्ट्ये?

ही ट्रेन अत्याधुनिक सोयी सुविधांनी फक्त असून तिला एकूण 16 डब्बे असणार आहेत. यात थ्री टायर एसी, टू टायर एसी व फर्स्ट क्लास एसी अशा तीन प्रकारचे डबे असणार आहेत व या सर्व डब्यांमध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा देण्यात आलेल्या आहेत. यामुळे प्रवाशांना खूप आरामदायी प्रवास करता येणे शक्य होणार आहे.

ही ट्रेन ताशी१६० किलोमीटर वेगाने धावेल व ही ट्रेन प्रामुख्याने रात्रीच्या प्रवासासाठी खूप योग्य मानली जात आहे. आठशे किलोमीटर पासून ते बाराशे किलोमीटर पर्यंतच्या मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार आहे.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या ट्रेनमध्ये ऑक्सिजनची पातळी खूप चांगली असल्याने कुठल्याही प्रकारच्या संसर्गापासून प्रवाशांचे संरक्षण होणार आहे. या ट्रेनच्या माध्यमातून प्रवासी अगदी आरामात झोपून प्रवास करू शकतात.

 कशा स्वरूपाचे आहे या ट्रेनचे मधले इंटेरियर?

वंदे भारत स्लीपर ट्रेनचे जर आपण इंटेरियर बघितले तर ते एखाद्या फाइव्ह स्टार हॉटेल सारखे आलिशान स्वरूपाचे आहे. दिव्यांग प्रवासांना देखील या ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करता यावा याकरिता विशेष स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आलेली आहे व या ट्रेनचे दरवाजे स्वयंचलित पद्धतीचे आहेत.

या ट्रेनमध्ये वरील आणि मधल्या शायिकेपर्यंत जाण्याकरिता जिना देखील चांगला करण्यात येणार असून ज्येष्ठ व्यक्तींना देखील त्यामुळे शायिकेपर्यंत सहजपणे जाता येणार आहे. एवढेच नाहीतर फर्स्ट क्लास एसी कोचमध्ये प्रवाशांना आंघोळी  करिता गरम पाण्याची सोय देखील यामध्ये करण्यात आलेली असून प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून संपूर्णपणे काळजी घेण्यात आलेली आहे.

या ट्रेनच्या सर्व कोचमध्ये सेंसर बेस्ड दरवाजे बसविण्यात आलेले आहेत व प्रत्येक बर्थ च्या बाजूला पॅड फीचर देखील असणार आहे. इतकेच नाहीतर फायर सेफ्टी, लोको पायलट क्रूच्या सोयीसाठी स्वतंत्र टॉयलेट, प्रवासी माहिती फलक इत्यादी सुविधा देखील या ट्रेनमध्ये असणार आहेत.

विशेष म्हणजे विमानामध्ये ज्याप्रमाणे बायो व्हॅक्युम टॉयलेट असतात अगदी तसेच टॉयलेट या ट्रेनमध्ये असणार आहेत. त्यामुळे दुर्गंधीचा कुठल्याही प्रकारचा त्रास वंदे भारत स्लीपरमध्ये प्रवाशांना होणार नाही. तसेच या ट्रेनमध्ये स्पेशल बर्थ, यूएसबी चार्जिंग तसेच रीडिंग लाईट सह सामान ठेवण्यासाठी देखील उत्तम जागा मिळणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts