Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन. ही ट्रेन सर्वप्रथम 2019 मध्ये सुरू झाली होती. 2019 मध्ये नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर या गाडीचे संचालन सुरू झाले आणि तदनंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवला गेला.
सध्या स्थितीला देशातील 65 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. आपल्या महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्याला आत्तापर्यंत अकरा वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्या आहेत. दरम्यान महाराष्ट्राला येत्या काही दिवसांनी बारावी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मिळणार असल्याचे वृत्त हाती आले आहे.
सध्या राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते सिकंदराबाद, नागपूर ते इंदोर, पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
अशातच आता मुंबई ते भोपाल दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू होणार अशी बातमी हाती येत आहे. यामुळे मुंबईहून भोपाळला जाणाऱ्या प्रवाशांना या गाडीचा फायदा होईल तसेच भोपाळ हुन मुंबईला येणाऱ्या हजारो नागरिकांना या गाडीमुळे जलद गतीने मुंबईला येता येणे शक्य होईल असा विश्वास व्यक्त होत आहे.
भोपाळ आणि मध्य प्रदेशच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी, स्लीपर पर्यायांसह तीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या नोव्हेंबर किंवा डिसेंबरपर्यंत भारतीय रेल्वे सुरू करणार अशी अपेक्षा आहे.
भोपाळ ते मुंबई, लखनौ आणि पाटणा असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या चालवल्या जाणार आहेत.
सर्व काही सुरळीत होत आहे, आणि गोष्टी नियोजित प्रमाणे पुढे गेल्यास, शहराला लवकरच तीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचा लाभ मिळू शकेल. स्लीपर पर्यायांच्या समावेशामुळे, या एक्स्प्रेस गाड्या प्रवाशांच्या प्रवासासाठी जलद आणि आरामदायी पर्याय उपलब्ध करून देतील.
या गाड्यांचे उद्घाटन प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे, ज्याचा उद्देश प्रवासाचा कालावधी कमी करणे आणि संपूर्ण प्रवासाचा अनुभव वाढवणे हा राहणार आहे.