Vande Bharat Update:- वंदे भारत ट्रेनने संपूर्ण देशामध्ये रेल्वे प्रवासामध्ये क्रांती घडवून आणली असून अगदी आरामदायी आणि वेगवान प्रवासाचा अनुभव जर घ्यायचा असेल तर वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून प्रवास करण्यामध्ये वेगळीच मजा आहे. या ट्रेनने प्रवास करण्याची सध्या खूप क्रेझ भारतातच नव्हे तर महाराष्ट्रात देखील दिसून येत आहे.
त्यापुढे महाराष्ट्रातील ज्या काही वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत त्यांना देखील प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. जर आपण भारताचा विचार केला तर संपूर्ण भारतामध्ये सध्या 34 मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. तसेच महत्त्वाचे म्हणजे आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये नव्या रूपामध्ये वंदे भारत अवतरणार असून ती आता केशरी रंगांमध्ये येणार आहे तसेच स्लीपर कोच असलेली वंदे भारत देखील काही दिवसात प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे. दिवसेंदिवस वाढणारा प्रतिसाद पाहता सरकारकडून देखील अनेक चांगल्या सुविधांचा शुभारंभ करण्यात येत आहे व त्यातीलच एक नव्या सेवेचा शुभारंभ केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला.
काय आहे मिरॅकल 14 मिनिट संकल्पना?
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, भारतीय रेल्वे विभागाकडून 1 ऑक्टोबर पासून ट्रेनची स्वच्छता अगदी वेगात आणि ताबडतोब करता यावी याकरिता मिरॅकल 14 मिनिट ही संकल्पना राबवली जाणार आहे. या संकल्पनेचा अर्थ म्हणजे वंदे भारत ट्रेनची स्वच्छता अर्थात साफसफाई आता फक्त 14 मिनिटात केली जाणार आहे.
एक आक्टोबर पासून 29 वंदे भारतमध्ये या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला असून भारतीय रेल्वेमध्ये ही संकल्पना प्रथमच घेण्यात आलेली आहे. जर आपण जगाचा विचार केला तर जपान मधील टोकियो तसेच ओसाका इत्यादी स्टेशनवर अवघ्या सात मिनिटांमध्ये बुलेट ट्रेनची स्वच्छता केली जाते व परत प्रवासासाठी ती ट्रेन सज्ज होते.
अगदी हीच संकल्पना आता भारतीय रेल्वेच्या माध्यमातून सुरू करण्यात आली असून वंदे भारत ट्रेन पासून ते राबवण्यात येणार असल्याची माहिती देखील केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांनी दिली. या संकल्पनेमध्ये जे काही फ्रंटलाईन कर्मचारी काम करतात त्यांच्या संख्येमध्ये वाढ न करता या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कौशल्य आणि काम करण्याची पद्धत यामध्ये बदल करून ही सेवा शक्य झाली आहे. ही सुविधा सुरू करण्याआधी तिची ट्रायल घेण्यात आली.
या ट्रायल मध्ये रेल्वे अटेंन्डसने 28 मिनिटांमध्ये ट्रेन स्वच्छ केली. त्यानंतर ट्रेनच्या साफसफाईचा कालावधी 18 मिनिटापर्यंत आला व आता कुठल्याही प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर न करता ट्रेन स्वच्छ करण्यासाठी फक्त 14 मिनिटांचा कालावधी लागणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. सध्या या सुविधेचा शुभारंभ दिल्ली कॅन्टोन्मेंट, वाराणसी, गांधीनगर तसेच मैसूर आणि नागपूर या ठिकाणी करण्यात आला असून टप्प्याटप्प्याने ही संकल्पना इतर रेल्वे सेवांमध्ये देखील लागू केली जाणार आहे.