Vastu Tips : भारतात वास्तुशास्त्राला मानणाऱ्यांची संख्या फार अधिक आहे. वास्तुशास्त्रानुसार घराची निर्मिती असावी असे अनेकजण सांगतात. कारण की वास्तुशास्त्रानुसार घराची निर्मिती नसेल तर घरात सुख शांती नांदत नाही. यामुळे नवीन घर बनवताना प्रत्येक जण वास्तुशास्त्रानुसारच घराची रचना करताना दिसतो.
दरम्यान वास्तुशास्त्रात झोपण्याच्या पद्धती संदर्भातही मोठी माहिती देण्यात आली आहे. आपल्या झोपण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे आर्थिक आणि शारीरिक नुकसान होऊ शकते असा दावा वास्तुशास्त्रात करण्यात आला आहे. वास्तुशास्त्रानुसार नेहमीच योग्य दिशेने डोकं ठेवून झोपले पाहिजे.
जर चुकीच्या दिशेने डोकं ठेवून झोपलो तर आयुष्यात अनेक चुकीच्या आणि अनपेक्षित घटना घडतात. यामुळे आर्थिक तंगी येण्याची भीती असते. दरम्यान आता आपण वास्तुशास्त्रात झोपण्याची योग्य पद्धत कोणती सांगितली गेली आहे, कोणत्या दिशेने डोकं ठेवून झोपले नाही पाहिजे ? या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
वास्तुशास्त्रात झोपण्याच्या पद्धतीबाबत काय म्हटले आहे?
वास्तुशास्त्रात सांगितलेल्या नियमानुसार रात्री झोपताना डोके नेहमीच पूर्वेला ठेवून झोपावे. झोपतांना डोके पूर्वेला आणि पाय पश्चिमेला असावेत. कारण की सूर्य पूर्व दिशेकडून उगवतो आणि नेहमीच सूर्योदयाच्या दिशेला डोके ठेवून झोपले पाहिजे.
सूर्योदयाच्या दिशेला पाय करून झोपणे चुकीचे मानले गेले आहे. जर तुम्ही जिथून सूर्य उगवतो त्या दिशेला अर्थातच पूर्व दिशेला पाय करून झोपलात तर तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो.
या चुकीच्या सवयीमुळे तुम्ही विनाकारण गरिबी ओढवून घेऊ शकता. डोके एक तर पूर्व दिशेकडे ठेवून झोपावे किंवा मग वास्तुशास्त्रानुसार, झोपताना डोके दक्षिण किंवा उत्तर-दक्षिण दिशेकडे असणे सर्वात शुभ मानले जाते.
या दिशेला डोके ठेवून झोपल्यास तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल तुम्हाला जाणवतील. या दिशेने डोकं ठेवून झोपल्यानंतर प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात. रात्री झोपताना पाय उत्तर आणि पश्चिम दिशेला ठेवणे उत्तम राहते.
तसेच वास्तुशास्त्रानुसार , रात्री झोपताना दक्षिण दिशेकडे तोंड करून झोपण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दक्षिणेकडे झोपल्यामुळे आरोग्यही चांगले राहते. आजारांपासून आपले संरक्षण होते. वास्तुशास्त्राप्रमाणेच विज्ञानात देखील झोपण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो असे नमूद करण्यात आले आहे.
विज्ञानानुसार, दक्षिण दिशेला पाय ठेवून झोपल्याने चुंबकीय प्रवाह पायात शिरून डोक्यातून बाहेर पडतो. त्यामुळे डोके जड होते आणि मानसिक तणाव वाढतो. यामुळे दक्षिण दिशेला पाय ठेवून झोपू नये.
याशिवाय वास्तुशास्त्रात आणखी काही नियम आहेत. जसे की, कधीही झोपण्याच्या दोन तास आधी जेवण करावे. यामुळे पोटाची समस्या उद्भवत नाही. घरात लक्ष्मीचा वावर हवा असेल तर चुकूनही संध्याकाळी झोपू नये. अनेक जण सायंकाळी झोपतात मात्र सायंकाळी झोपणे चुकीचे आहे.
सायंकाळी झोप घेतल्यास रात्री उशिरापर्यंत जागे राहण्याची सवय पडते आणि यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. रात्री जर तुम्हाला शांत झोप लागत नसेल तर तुम्ही देवाचे नामस्मरण करून झोपायला हवे असे केल्याने तुम्हाला शांत झोप लागणार आहे.