Vastu Tips : वास्तुशास्त्रात घर कसं असावं या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. वास्तुशास्त्रानुसार घराची निर्मिती केली तर अशा घरात नेहमीच सुख-शांती नांदते आरोग्य उत्तम राहते आणि अशा कुटुंबावर माता लक्ष्मी विशेष प्रसन्न राहते असे जाणकारांचे म्हणणे आहे. वास्तुशास्त्रात घरासंदर्भात अनेक बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे.
खरंतर अनेक घरांमध्ये नेहमीच क्लेश राहतो, सुख शांती नांदत नाही, घरातील सदस्यांचे आरोग्य नेहमीच निरोगी राहत नाही, पैसे अधिक प्रमाणात खर्च होतात, पैसे हातात टिकत नाहीत अशा अडचणी पाहायला मिळतात. मात्र या सर्व अडचणींचा उपाय वास्तुशास्त्रात नमूद करण्यात आला आहे. आज आपण वास्तुशास्त्राच्या अशाच एका नियमाची माहिती पाहणार आहोत.
वास्तुशास्त्राच्या या नियमाचे पालन केल्यास आयुष्य सुखकर होणार
वास्तुशास्त्र असे सांगते की कोणत्याही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जर पाण्याने भरलेले भांडे किंवा बादली ठेवली गेली तर यामुळे घरात सकारात्मक ऊर्जांचा संचार होतो. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जर पाण्याने भरलेले भांडे असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही.
अशा घरात नेहमीच सुख शांती समृद्धी नांदते. माता लक्ष्मी देखील अशा घरावर विशेष प्रसन्न असते आणि अशा कुटुंबाकडे मोठ्या प्रमाणात धनसंपत्ती देखील असते. घराच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ पाण्याने भरलेले भांडे असेल तर अशा कुटुंबातील सदस्य आपापल्या क्षेत्रात चांगले यश मिळवताना दिसतात.
असं म्हणतात की पाण्यामध्ये नकारात्मक ऊर्जा घालवण्याची क्षमता आहे. यामुळे जर पाण्याने भरलेले भांडे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ राहिले तर वाईट शक्ती घरात शिरत नाही.
अशा लोकांचे दुर्भाग्य देखील सौभाग्यत बदलते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी हा एक बेस्ट उपाय असल्याचा दावा वास्तुशास्त्रात करण्यात आला आहे. मात्र घराच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ फक्त तांबे किंवा पितळ यांसारख्या धातूंपासून बनलेल्या भांड्यातच पाणी ठेवले गेले पाहिजे.
भांडे हे पूर्ण स्वच्छ पाहिजे आणि भांड्यात ठेवलेले पाणी सातत्याने चेंज करत राहिले पाहिजे. कोणत्या दिशेला हे भांडे ठेवावे याबाबत वास्तुशास्त्रातील जाणकारांकडून सल्ला घेणे आवश्यक आहे.
हे भांडे नेहमी उंच जागेवर ठेवले पाहिजे. म्हणजेच टेबल सारख्या उंच वस्तूवर हे भांडे ठेवले गेले पाहिजे. अशा भांड्यावर थेट सूर्यप्रकाश किंवा उष्णता पडणार नाही याची काळजी मात्र घ्यावी.