Vastu Tips : हिंदू सनातन धर्मात वैदिक ज्योतिष शास्त्र प्रमाणेच वास्तुशास्त्राला देखील विशेष महत्त्व देण्यात आले आहे. अनेकजण वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार वास्तूची बांधणी केलेली असेल तर घराची भरभराट होते अन्यथा कितीही कष्ट केले तरीदेखील संकटांचा सामना करावा लागतो.
वास्तुशास्त्रानुसार घराची बांधणी केलेली नसेल, वास्तुस्थिती बरोबर नसेल, म्हणजे वास्तुशास्त्रात ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत त्या गोष्टींचे पालन होत नसेल तर लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक जण अशी तक्रार करतात की कितीही कष्ट केलेत तरीही डोक्यावर असणारे कर्ज उतरत नाही.
दरम्यान आज आपण वास्तुशास्त्रात याबाबत नेमके काय म्हटले गेले आहे याची थोडक्यात माहिती पाहणार आहोत. वास्तुशास्त्रात डोक्यावर कर्ज असेल तर ते कर्ज लवकरात लवकर फेडण्यासाठी काही सोपे उपाय देण्यात आले आहेत. आज आपण वास्तुशास्त्रात देण्यात आलेल्या याच सोप्या उपायांची माहिती पाहणार आहोत.
काय सांगते वास्तूशास्त्र?
पहिला उपाय : तुम्ही कर्जाच्या विळख्यात सापडले असाल आणि तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या डोक्यावरील कर्ज फेडायचे असेल तर यासाठी पहिला उपाय म्हणजे तुम्ही घेतलेले कर्ज हे नेहमी मंगळवारी फेडा. कर्ज फेडण्यासाठी मंगळवार हा उत्तम दिवस मानला गेला आहे. या दिवशी कर्जाची रक्कम परत केल्यास लवकरच कर्जमुक्ती मिळते असा दावा शास्त्रांमध्ये करण्यात आला आहे.
दुसरा उपाय : कर्ज जर लवकरात लवकर नील करायचे असेल तर यासाठीचा दुसरा उपाय आहे कर्जमुक्ती मंत्राचा जाप करणे. ॐ मंगळमूर्तये नमः किंवा ॐ हिरण्यवर्ण हरिणी सुवर्णरत्स्रजाम या मंत्रांचा जप केल्यास कर्ज लवकर फिटते असा दावा शास्त्रांमध्ये करण्यात आला आहे.
तिसरा उपाय : कर्ज फेडण्यासाठी शेवटचा आणि तिसरा उपाय म्हणजे पिंपळाच्या झाडाची पूजा करणे. शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास कर्ज लवकरात लवकर फिटू शकते असा दावा शास्त्रांमध्ये करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी अंघोळ करून पिंपळाच्या झाडाची पूजा करा. झाडाखाली दिवा लावा, प्रदर्शना घाला आणि मनोभावे कर्ज फिटू दे अशी प्रार्थना करा. हा उपाय केल्यास डोक्यावरील कर्ज लवकरात लवकर फिटते असे काही लोकांचे म्हणणे आहे.