स्पेशल

Vidhan Sabha Election 2024: मतदानाच्या दिवशी ऐनवेळी होणारी धावपळ टाळा व ‘या’ सोप्या पद्धतीने घरबसल्या मतदार यादीतील तुमचं नाव शोधा! वाचा माहिती

Vidhan Sabha Election 2024:- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे वेळापत्रक केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले असून त्यानुसार आता 20 नोव्हेंबर 2024 रोजी एकाच दिवशी संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे व या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

त्यामुळे आता राज्यात लोकशाहीच्या उत्सवाचे वातावरण आपल्याला पुढचे काही दिवस दिसून येईल. त्यामुळे पक्षांचे नेते तर कार्यकर्त्यांपासून तर मतदारांपर्यंत आता उत्साह शिगेला  पोहोचल्याचे चित्र आहे.

परंतु ज्या दिवशी मतदान असते तो दिवस मतदारांचा असतो व मतदान करणे हा आपला हक्क असल्यामुळे प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे तितकेच गरजेचे आहे. परंतु बऱ्याचदा मतदानाच्या दिवशी आपण मतदान केंद्रावर जातो व तेव्हाच मतदार यादीमध्ये आपले नाव सापडत नाही.

कारण निवडणुकांच्या वेळी मतदार हा महत्त्वाचा घटक असतो व मतदारांनी दिलेल्या मतांवर नेते निवडून येत असतात. जेव्हा निवडणुका जाहीर केल्या जातात तेव्हा मतदार यादी देखील जाहीर होतात व त्या याद्या दरवेळी बदलत असतात.

या सगळ्या प्रक्रियेमध्ये बऱ्याचदा मतदार यादीतून नावे गायब होतात. कारण मतदार याद्या या प्रत्येक वेळी अपडेट होत असतात. तसेच या यादीत काही बदल होत असल्यामुळे बऱ्याचदा नाव चुकते किंवा चुकीने मतदार यादीतील नाव देखील वगळले जाण्याची शक्यता असते

व या प्रकारामुळे जर मतदार यादीत नाव नसेल तर मात्र आपल्याला आपल्या मतदानाच्या हक्कापासून मुकावे लागण्याची शक्यता असते. त्यामुळे मतदानाच्या दिवशी धावपळ होऊ नये याकरिता त्या आधीच तुम्ही तुमचे नाव तपासून घेणे गरजेचे असते. या अनुषंगाने या लेखात आपण मतदार यादीतील तुमचं नाव कशा पद्धतीने शोधता येईल? याबद्दलची माहिती थोडक्यात बघू.

 अशा पद्धतीने मतदार यादीत चेक करा तुमचे नाव?

1- ऑनलाइन पद्धतीने तुम्ही घरी बसून देखील मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही याचा शोध घेऊ शकतात. याकरिता सगळ्यात अगोदर तुम्हाला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या  https://electoral.eci.gov.in/ या लिंक ला क्लिक करावे लागेल.

2- या लिंकला क्लिक केल्यानंतर वेबसाईटच्या वरच्या बाजूला तुम्हाला सर्च बाय डिटेल्स, सर्च बाय  EPIC आणि सर्च बाय मोबाईल असे तीन पर्याय दिसतात व यातील एका पर्यायावर क्लिक करावे.

3- त्या ठिकाणी आवश्यक माहिती भरून कॅपच्या कोड सबमिट करावा व त्यानंतर सर्चवर क्लिक करावे.

4- सर्च केल्यानंतर मतदार यादीतील तुमचं नाव, तुमचा एपिक नंबर म्हणजेच तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती दिसते.

5- अशा पद्धतीने तुम्ही सर्च केल्यानंतर जर तुमचे नाव दिसत नसेल तर तुम्ही जो काही तपशील भरलेला आहे तो पुन्हा तपासून पहावा. दुसऱ्या प्रयत्नात वर दिलेल्या तीन पर्यायांपैकी इतर दोन पर्यायांचा वापर करून पहावा. तरी देखील तुमचे नाव दिसत नसेल तर मात्र तुम्ही राज्य निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधावा.

 मोबाईल संदेश म्हणजेच एसएमएसच्या माध्यमातून मतदार यादीतील नाव तपासणे

या व्यतिरिक्त तुम्ही एसएमएसच्या माध्यमातून देखील मतदार यादीतील तुमचे नाव तपासू शकतात. याकरिता तुमच्या मोबाईल मधील मेसेज बॉक्स मध्ये जाऊन मेसेज टाईप करावा व मेसेज टाईप करताना स्पेस दाबावा.

त्यानंतर तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक टाईप करावा व हा एसएमएस  9211728082 किंवा 1950 या क्रमांकावर पाठवावा.या केलेल्या एसएमएसचे उत्तर तुम्हाला एसएमएस मध्येच मिळते.

एसएमएसमध्ये भाग क्रमांक तसेच मतदान केंद्र क्रमांक आणि नाव पाठवले जाते. परंतु जर तुमचे नाव मतदार यादीत नसेल तर नो रेकॉर्ड फाउंड असा मेसेज येतो. असा मेसेज जर तुम्हाला आला तर मात्र तुम्ही राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts