Viral News : जगात अनेक आश्चर्यकारक अशा घटना घडत असतात. काही घटना या खूपच दुर्मिळ असतात. अशा परिस्थितीत या घटना तेजीने व्हायरल देखील होतात. दरम्यान आता बीड जिल्ह्यातून अशीच एक आश्चर्यकारक आणि अविश्वसनीय घटना समोर आली आहे. तुम्ही आत्तापर्यंत एखाद्या शेळीने जुळी किंवा तीळी करडे जन्माला घातलेले ऐकलं असेल, डोळ्यांनी पाहिलं असेल.
मात्र तुम्ही कधी एकाचं शेळीने पाच पिल्लांना जन्म दिल्याची घटना ऐकली आहे किंवा पाहिली आहे तर कदाचित तुमचे उत्तर नाहीच असेल. पण बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याच्या दादेगाव येथील एका पशुपालक शेतकऱ्यांच्या घरी एका शेळीने पाच पिल्लांना जन्म दिला आहे. यामुळे या पशुपालक शेतकऱ्यांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे.
तसेच या आश्चर्यकारक आणि दुर्मिळ अशा घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. अनेकांना याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता आहे तर अनेकांना डोळ्यांनी पाहूनही अजून विश्वासचं बसत नसल्याचे चित्र आहे. आष्टी तालुक्यातील मौजे दादेगाव येथील पशुपालक शेतकरी गंगाधर आसराची पोटे यांच्या शेळीच्या पोटी एकूण पाच पिल्लांनी जन्म घेतला आहे. मंगळवारी दुपारी ही घटना घडली आहे. खरं पाहता गंगाधर यांनी ही शेळी तीन वर्षांपूर्वी विकत आणली होती.
शेळी विकत आणल्यानंतर या शेळीने पहिल्या वर्षी एक पिलाला जन्म दिला. तसेच दुसऱ्या वर्षी म्हणजेच गेल्या वर्षी या शेळीने चार पिलांना जन्म दिला होता. दरम्यान मंगळवारी दुपारी या शेळीने चक्क पाच पिलांना, करडांना जन्म दिला असल्याने सध्या सोशल मीडियावर ही घटना मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. मीडियामध्ये देखील या घटनेची मोठी चर्चा रंगली आहे. दरम्यान गंगाधर शेळीने पाच करडांना जन्म दिला असल्याने आनंदात आहेत.
गंगाधर यांनी तालुक्यातील ही पहिलीच घटना असल्याचा दावा केला आहे. एकंदरीत एकाच शेळीने पाच पिल्लांना जन्म दिला असल्याने पशुपालक आनंदी आहेत. गंगाधर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वी त्यांनी पाच हजाराला ही शेळी विकत आणली होती. गेल्या वर्षी चार आणि आता यावर्षी तब्बल पाच पिल्लांना जन्म दिला असल्याने ते समाधानी आहेत.
पंचक्रोशीत ही घटना वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाली असून आजूबाजूचे पशुपालक शेतकरी देखील या पिल्लांना पाहण्यासाठी त्यांच्या घरी येत आहेत. याबाबत तालुका पशुधन विकास अधिकारी महोदय यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारणपणे शेळी तीन ते चार पिल्लांना जन्म देऊ शकते मात्र एकाच शेळीने पाच पिलांना जन्म देण्याची ही घटना विशेष असून अतिशय दुर्मिळ स्वरूपाची आहे.