स्पेशल

बेंगळुरू-तुमाकुरू हायवेवर Volvo XC90 कारचा अपघात, भीषण अपघातात सहा ठार ! जगातली सर्वाधिक सुरक्षित गाडी, पण एकही जण वाचलं नाही

Volvo XC90 World’s Most Safe Car Accident : आज, शनिवारी सकाळी बेंगळुरू-तुमाकुरू महामार्गावर (NH-48) नेलमंगलाजवळ एक भीषण रस्ते अपघात झाला. या भीषण रस्ता अपघातात, बंगळुरू स्थित IAST सॉफ्टवेअर सोल्यूशन्सचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रम येगापागोळ यांच्यासह कुटुंबातील सहा सदस्यांना त्यांच्या व्हॉल्वो XC90 या जगातील सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या एसयूव्हीवर कंटेनरची लॉरी उलटल्याने जीव गमवावा लागला आहे.

ही घटना थिप्पागोंडानाहल्ली जवळ सकाळी 11 वाजता घडली. या घटनेमुळे चंद्रम यांच्या सांगली जिल्ह्यातील मोराबागी या मुळगावात भयाण शांतता असून त्यांच्या परिवारात शोककळा पसरली आहे. बेंगळुरूमधील टेक समुदायासाठी सुद्धा हा एक मोठा धक्का समजला जात आहे. या घटनेमुळे रस्ते व त्यावरील पायाभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत सोबतच सर्वाधिक सुरक्षित कार म्हणून ओळख मिळवलेल्या कंपनीच्या या अध्ययावत कारवर देखील अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, IAST सॉफ्टवेअर सोल्युशन्सचे MD यांनी ही Volvo XC90 Suv कार ऑक्टोबर 2024 मध्ये विकत घेतली होती. हे कंपनीची एक लेटेस्ट मॉडेल आहे. ही जगातील सर्वाधिक सुरक्षित कार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. मात्र या अपघातात चंद्रम येगापागोळ यांच्यासह सहा जणांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान आज आपण हा अपघात नेमका कसा घडला, जगातील सर्वाधिक सुरक्षित कारचा झालेल्या अपघातात 6 जण कसे मृत्युमुखी पडलेत, या अपघाताचा थरार नेमका कसा होता? याचा आढावा घेणार आहोत.

अपघात कसा झाला ?

मिळालेल्या माहितीनुसार नाताळची सुट्टी साजरी करण्यासाठी चंद्रम आणि त्यांचे कुटुंब बेंगळुरूहून त्यांच्या मूळ गावी, सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोराबागी गावात जात होते. दरम्यान, बेंगळुरू-तुमाकुरू हायवेवर एक आयशर कंटेनर बेंगळुरूहून तुमाकुरूकडे जात होती अन चंद्रमची व्होल्वो एक्ससी90 एसयूव्ही याचं कंटेनर पाठोपाठ जात असतांना ही दुःखद घटना घडली.

प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितल्याप्रमाणे, बेंगळुरूकडे जाणाऱ्या वेगवान कंटेनर लॉरीचे नियंत्रण सुटले अन कंटेनर रस्त्याच्या दुभाजकावर चढले आणि दुभाजकाला धडकले. या धडकेमुळे कंटेनर खाली कोसळत होते अन त्याचवेळी चंद्रमची व्होल्वो एसयूव्ही त्याच्या शेजारून जात असल्याने चंद्रमच्या व्होल्वो एसयूव्हीवर हे कंटेनर पडले आणि हा भीषण अपघात झाला. या अपघाताचा थरार इतका भयावय होता की कारमधील सर्व सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर कँटर आणि लॉरीचे चालक किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या भीषण अपघातात आयएएसटी सॉफ्टवेअर सोल्यूशन्सचे एमडी चंद्रम येगापागोळ (४८), त्यांची पत्नी गौराबाई येगापागोळ (42), त्यांचा मुलगा ज्ञान येगापागोळ (१६), त्यांची मुलगी दीक्षा येगापागोळ (१२), त्यांची मुलगी आर्य येगापागोल (6), त्यांची वहिनी विजयालक्ष्मी (३६), यांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील सहा जण या रस्ते अपघातात ठार झालेत. यामुळे येगापागोळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Volvo ची ही कार खरंच सुरक्षित आहे का?

या अपघाताने पुन्हा एकदा भारतीय महामार्गांवर वेग आणि सुरक्षा पायाभूत सुविधांचा अभाव हे धोके अधोरेखित केले आहेत. सध्या, नेलमंगला वाहतूक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अपघाताच्या घटनाक्रमाचा तपास सुरू आहे. प्राथमिक अहवालानुसार, कंटेनर लॉरीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झालायं. अशा प्रकारचा भीषण अपघात झाल्याने व्होल्वो XC90 सारख्या उच्च श्रेणीच्या वाहनांची असुरक्षेचा प्रश्न सुद्धा आता ऐरणीवर आला आहे.

तर दुसरीकडे, XC90 जरी जगातील सर्वाधिक सुरक्षित कार असल्याचा दावा होत असला तरीदेखील कोणतेही वाहन जड कंटेनरवर थेट पडल्यास त्याचा जोर सहन करू शकत नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. असे भयंकर अपघात टाळण्यासाठी कडक वाहतूक नियम, सुधारित रस्ते पायाभूत सुविधा आणि प्रतिबंधात्मक उपायांची तातडीची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी यावेळी व्यक्त केले. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे वोल्वो XC90 खरंच सुरक्षित कार आहे का? तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की ही गाडी 2002 मध्ये लॉन्च झाली.

महत्त्वाची बाब म्हणजे लाँच झाल्यापासून व्होल्वो XC90 मध्ये कोणतेही जीवघेणे क्रॅश झालेले नाहीत. व्होल्वो XC90 कार लॉन्च झाल्यापासून आत्तापर्यंत या गाडीला जेवढे अपघात झालेत त्या साऱ्या अपघातांमध्ये कोणाचाही जीव केलेला नाही. पण आजच्या या घटनेने याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मात्र तज्ञांनी कोणत्याही वाहनावर जर कंटेनर सारखें अवजड वाहन पडले तर असा भीषण अपघात घडू शकतो असे म्हटले आहे. खरेतर, XC90 हे त्याच्या सुरक्षिततेच्या वैशिष्ट्यांसाठी ओळखले जाते. XC90 ने युरो NCAP क्रॅश चाचण्यांमध्ये फाइव्ह स्टार रेटिंग मिळवली आहे. ही कंपनीची सर्वाधिक सुरक्षित कार म्हणून ओळखली जाते.

XC90 मध्ये ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टम (AEB), लार्ज ऍनिमल डिटक्शन आणि ब्लाइंड-स्पॉट मॉनिटरिंग यांसारखें अद्ययावत सेफ्टी फीचर्स आहेत. XC90 मध्ये लेन डिपार्चर वॉर्निंग, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि फॉरवर्ड कॉलीजन वॉर्निंग यांसारखी चालकाला सहाय्य करणारी अद्ययावत तंत्रज्ञान आहेत. XC90 मध्ये फ्रंट आणि साइड एअरबॅग्ज, व्हिप्लॅश प्रोटेक्शन सीट आणि यांसारखी अंतर्गत सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. मात्र असे असतानाही या गाडीचा आजचा अपघात झाला त्यात कोणीच वाचू शकले नाही.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts