Voter List:-मतदान हा आपला मूलभूत अधिकार असून मतदानाचा हक्क बजावणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे. परंतु बऱ्याचदा मतदान करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. काहींना मतदार ओळखपत्र तर काहींचे मतदार यादीत नाव आहे की नाही इत्यादी समस्या(Problem) निर्माण होतात. बऱ्याचदा मतदान ओळखपत्र हरवते. या व अशा अनेक समस्यांमुळे मतदानाला मुकावे लागते.
बऱ्याचदा मतदारा यादीमध्ये नाव गहाळ होते व मतदान करताना समस्या निर्माण होते. त्यामुळे वेळेला धावपळ होऊ नये म्हणून तुमच्या गावाची मतदान यादीत तुमचे नाव आहे की नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईल(Mobile)च्या सहाय्याने तपासू शकतात. या लेखामध्ये आपण लेखामध्ये गावाचे मतदान यादी मोबाईल मध्ये कशा पद्धतीने डाऊनलोड(Download)करावी? याबद्दल महत्वाची माहिती घेणार आहोत.
मोबाईलवर मतदार यादी कशी बघायची?
1-गावाची ग्रामपंचायतची मतदार यादी पाण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला ceo.maharashtra.gov.in असे टाईप करावे लागेल.
2- त्यानंतर तुमच्यासमोर मुख्य निवडणूक अधिकारी ही एक वेबसाईट ओपन होते.
3- नंतर तुम्हाला तुमच्या गावाची यादी(List)पाहण्यासाठी तुमचा जिल्हा, तुमचा विधानसभा मतदारसंघ आणि गावाचं नाव निवडणे गरजेचे आहे.
4- त्यानंतर कॅपच्या कोड नमूद करावा. मध्ये समोरच्या कॉलम मध्ये दिसणारे आकडे किंवा अक्षर व्यवस्थित जशीच्या तशी नमूद करणे गरजेचे आहे.
5- यानंतर ओपन पीडीएफ यावर क्लिक केलं की तुमच्या समोर तुमच्या गावाचे मतदार यादी ओपन होते.
अगदी इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या गावाचे मतदार यादी आरामात पाहू शकतात.