Low Investment Business Idea : अलीकडे नोकरी ऐवजी व्यवसाय सुरू करण्याला विशेष पसंत दाखवली जात आहे. आधी नवयुवक तरुण उच्च शिक्षणानंतर एकतर सरकारी नोकरी किंवा मग चांगल्या मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असत.
आता मात्र परिस्थिती पूर्णपणे पालटली आहे. विशेषता कोरोना काळापासून तरुणांची मानसिकता बदलली आहे. अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना नारळ दिला असल्याने आता खाजगी नोकरी करणाऱ्यांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळत आहे.
आता तरुण स्वतःचा व्यवसाय करू पाहत आहेत. पण, व्यवसाय म्हणजे लाखो रुपयांची गुंतवणूक असा अनेकांचा समज आहे. त्यामुळे इच्छा असताना देखील अनेकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येत नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका बिजनेस आयडिया बाबत माहिती देणार आहोत याची सुरुवात अवघ्या सत्तर हजार रुपयात होऊ शकते.
आम्ही ज्या बिजनेस बाबत बोलत आहोत तो बिझनेस सुरु करून पहिल्या दिवसापासूनच कमाई करता येणार आहे. महिन्याकाठी या व्यवसायातून 30 हजारापर्यंतची कमाई होऊ शकते असा अंदाज आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बिजनेस विषयी सविस्तर माहिती.
कोणता आहे तो व्यवसाय
अलीकडे शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येत आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरात आता मेट्रो सुरू झाली आहे मात्र तरीही प्रवाशांची संख्या पाहता पब्लिक ट्रान्सपोर्टवर मोठा ताण पडत आहे. सिटी बस, मेट्रो, लोकल यामध्ये मोठी गर्दी होत आहे.
यामुळे आता अनेक जण शहरात प्रवासासाठी कॅब बुक करत आहेत. प्रायव्हेट कॅब बुक करून अनेक जण शहरात प्रवास करतात. प्रायव्हेट कॅब व्यतिरिक्त आता बाईकने प्रवास करण्याला देखील प्रवाशांच्या माध्यमातून पसंती दाखवली जात आहे.
दरम्यान तुम्ही या संधीचे सोने करून स्वतःचा व्यवसाय थाटू शकणार आहात. तुम्ही तुमच्या बाइकला Ola, Uber, Rapido किंवा खाजगी कॅब सेवा देणाऱ्या इतर कंपन्यांशी जोडून चांगले पैसे कमावू शकता.
महिन्याला होणार तीस हजाराची कमाई
जर तुम्ही तुमची बाईक Ola शी लिंक केली तर तुम्हाला चांगले पैसे मिळणार आहेत. या व्यवसायातून मोटरसायकल चालवून तुम्ही महिन्यासाठी तीस हजारापर्यंतची कमाई करू शकता. विशेष बाब म्हणजे तुमची बाईक, ऑटो किंवा कार ओलाला जोडणे खूप सोपे आहे.
म्हणजेच ओलाला तुम्ही तुमची 75 हजार रुपयांची बाईक जोडून महिन्याला 30000 पर्यंतची कमाई करू शकणार आहात. Ola कंपनीला तुम्ही तुमची बाईक लावली तर तुम्हाला दहा ते बारा किलोमीटरच्या प्रवासासाठी प्रवाशांकडून शंभर रुपयांपर्यंतचे भाडे दिले जाणार आहे.
खरे तर शहरात फक्त दहा ते बारा किलोमीटरच्या प्रवासासाठीच बाईक ने प्रवास केला जातो. अशा परिस्थितीत जर तुम्ही दिवसाला 10 प्रवासी भाडे मारले तर तुम्हाला एक हजार रुपयांपर्यंतची कमाई होऊ शकणार आहे. यात तुमचा पेट्रोल आणि मेंटेनन्स चा खर्च वजा करून 700 ते 800 रुपयांचा नफा तुम्हाला एका दिवसात मिळणार आहे.
विशेष म्हणजे जर तुम्हाला दिवसाला दहापेक्षा अधिक प्रवासी मिळाले तर तुमचे उत्पन्न आणखी वाढणार आहे. जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही https://partners.olacabs.com या कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन याची अधिक माहिती मिळवू शकता.