Weak Cibil Score Loan : वाढत्या महागाईमुळे आणि वाढलेल्या गरजा पाहता आपल्या सर्वांनाच कधी ना कधी कर्ज घ्यावं लागतं. कर्ज घेताना मात्र अनेक समस्या देखील आपल्या पुढ्यात उभ्या राहतात. अनेकदा आपल्याला सिबिल स्कोर कमी असल्याच्या कारणाने कर्ज नाकारला जातं. यामुळे पैशांची उभारणी करताना आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज किंवा इतर कोणत्याही कर्जांसाठी सिबिल स्कोर हा एक महत्त्वाचा घटक आहे. या घटकाच्या आधारावर कर्जदार व्यक्ती कर्जाची परतफेड करण्यास पात्र आहे की नाही याची तपासणी संबंधित कर्ज पुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्थांच्या माध्यमातून केली जाते. सिबिल स्कोर किंवा क्रेडिट स्कोर हा 300 ते 900 या अंकात मोजला जातो.
ज्या व्यक्तीचा सिबिल स्कोर हा 750 पेक्षा अधिक असतो अशा व्यक्तींचा सिबिल चांगला म्हणजेच कर्जाचा इतिहास चांगला असल्याचे समजले जाते. परंतु ज्या व्यक्तींचा क्रेडिट स्कोर किंवा सिबिल स्कोर खराब असतो अशा व्यक्तींचा कर्ज परतफेडीचा इतिहास हा चांगला नसल्याचे बँका समजतात आणि अशा व्यक्तींना मग कर्ज देताना बँकांकडून पात्रतेचे सर्वच निकष काटेकोरपणे लावले जातात.
अनेकदा आजही नाकारलं जातं तर काहीवेळा अशा व्यक्तींना संबंधित बँका अधिक व्याजदरात कमी कर्ज देत असतात. दरम्यान आज आपण सिबिल स्कोर जर कमी असेल आणि बँकांकडून कर्ज देण्यास टाळाटाळ होत असेल तर कशा पद्धतीने कर्ज मिळवल जाऊ शकत याविषयी जाणून घेणार आहोत.
हे पण वाचा :- गोंदियाच्या शेतकऱ्याचा लेमनग्रास (गवती चहा) लागवडीचा प्रयोग यशस्वी; झाली लाखोंची कमाई
संयुक्त कर्ज
जर तुमचा सिबिल्स खराब असेल तर तुम्ही संयुक्त कर्जाचा विचार करू शकता. कर्ज घेण्यासाठी जामीनदार व्यक्ती निवडू शकता आणि जर जामीनदार व्यक्तीचा सिबिल चांगला असेल तर तुम्हाला कर्ज मंजूर होऊ शकतं. या संयुक्त कर्जाची एक मोठी विशेषता देखील आहे जर समजा तुमचा जामीनदार कोणी महिला असेल तर तुम्हाला या ठिकाणी व्याजदरात सवलत मिळू शकते.
पगार चांगला असेल तर सिबिल स्कोर खराब असतानाही मिळेल कर्ज :-
तुमचा सिबिल स्कोर खराब असेल मात्र पगार जर चांगला असेल तर बँकांकडून तुम्हाला कर्ज देताना विचार होऊ शकतो. बँकांना तुम्ही तुमच्या उत्पन्नाचे साधन किंवा पगाराचा पुरावा सादर करून आपण ते कर्ज फेडण्यासाठी सक्षम आहोत हे दाखवून देऊ शकता आणि cibil score कमी असतानाही कर्ज मिळवू शकता. मात्र सिबिल स्कोर कमी असल्यामुळे कर्ज मंजूर करायचे की नाही हे त्या बँकेच्या सक्षम अधिकाऱ्यांवर अवलंबून राहणार आहे.
बँकेच्या एफडीवर पण मिळतं कर्ज
ज्या व्यक्तींचा सिबिल स्कोर कमी असेल अशा व्यक्तींनी एफडीवर कर्ज घेणं सर्वाधिक उत्तम पर्याय आहे. जर एफडी मोडायची नसेल तर अशा व्यक्ती एफ डी वर कर्ज घेऊ शकणार आहेत. बँका एफडी केलेल्या रकमेच्या 90 ते 95 टक्के रक्कम कर्ज स्वरूपात मंजूर करू शकतात. अशा पद्धतीने कर्ज घेतल्यास प्रोसेसिंग शुल्क लागत नाही. मात्र एफडी साठी जो दर असतो त्यापेक्षा दोन टक्के अधिक व्याजदर आकारला जातो. कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेवर या ठिकाणी व्याज आकारलं जात.
हे पण वाचा :- एक शेतकरी एक डीपी योजना पुन्हा सुरु; कसा घेणार योजनेचा लाभ, वाचा सविस्तर
एन बी एफ सी मधून मिळणार कर्ज
ज्या व्यक्तींचा सिबिल खराब आहे अशा व्यक्तींना जर कर्जाची तातडीची गरज असेल तर अशा व्यक्ती बँकांऐवजी एनबीएफसी संस्थेंकडून कर्ज मिळवू शकणार आहेत. या ठिकाणी मात्र व्याजदर हा अधिक असतो. व्याजदराची चौकशी करूनच संबंधितांनी कर्जासाठी अप्लाय करणे आवश्यक राहणार आहे.
गोल्ड लोन पण आहे चांगला पर्याय
ज्या व्यक्तींचा सिबिल स्कोर खराब असतो अशा व्यक्तींसाठी गोल्ड लोनचा पर्याय सर्वाधिक फायदेशीर आहे. या अंतर्गत व्यक्तींना सध्याच्या सोन्याच्या किमतीच्या 75% पर्यंतची रक्कम कर्ज स्वरूपात मंजूर करून दिली जाते. निश्चितच सिबिल स्कोर खराब असला तरी देखील व्यक्तींना कर्ज हे मंजूर होऊ शकतं. मात्र असे असले तरी सिबिल स्कोर चांगला ठेवणे हे आवश्यक आहे. सिबिल स्कोर केवळ कर्ज मिळवण्यासाठीच नाही तर कर्जावर आकारला जाणाऱ्या व्याजदरासाठी देखील फायदेशीर ठरतो. यामुळे सिबिल स्कोर खराब होऊ देऊ नये तसेच यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते.
हे पण वाचा :- राज्य शासनाचा मोठा निर्णय! ‘त्या’ कर्जदार शेतकऱ्यांचे दहा कोटी रुपयांचे कर्ज माफ