Marathi News : भारताचा व एकंदरी जगाचा विचार केला तर असे अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी दिसून येतात की त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा गुणधर्मामुळे त्यांना वेगळे महत्त्व प्राप्त होते व मूल्य देखील इतर गोष्टींपेक्षा खूप जास्त असते.
अशा अनेक गोष्टी तुम्हाला खाद्यपदार्थांपासून तर फळांपर्यंत, नैसर्गिक संपदा पासून तर समुद्री संपदापर्यंत दिसून येतात. यामध्ये काही काही पदार्थ हे खूपच दुर्मिळ असतात व त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्यामुळे त्यांच्या किमती पाहिल्या तर आपला विश्वास बसत नाही अशा प्रकारच्या असतात.
आता आपण भारताचा विचार केला तर भारतामध्ये खाद्यपदार्थांचा विचार केला तर बहुसंख्य लोक ही मांसाहारी देखील आहेत. यामध्ये अनेक जण समुद्राच्या माध्यमातून जे काही अन्न मिळते त्यावर अवलंबून असतात किंवा
अनेक देशांमध्ये मासे देखिल मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात. याच माशांच्या बाबतीत आपण पाहिले तर जगातील जो काही सर्वात महागडा पदार्थ आहे व त्याची किंमत सोन्यापेक्षा देखील 50 पट अधिक आहे व तो देखील माशांशी संबंधित असून त्याचे नाव आहे अल्मास कॅवीयार होय.
काय आहे अल्मास कॅवियार?
याबाबतीत जर आपण प्रसिद्ध मीडियाचे वृत्त पाहिले तर त्यांच्यानुसार कॅवियार हे स्टर्जन माशाच्या अंडाशयामध्ये सापडणारे अंडे आहेत. परंतु यामध्ये सगळ्या माशांच्या अंड्यांना कॅविआर म्हणत नाहीत. फक्त स्टर्जन माशांच्या अंड्यांनाच कॅविआर म्हटले जाते.
जर आपण याचे प्रकार पाहिले तर ते चार असून यामध्ये अल्मास, बेगुला, ओस्सीएटर आणि सेव्रूगा या प्रकारांचा समावेश होतो. यामध्ये प्रकारानुसार प्रत्येक कॅविआरचा रंग आणि चव वेगवेगळे असते व यानुसार किमतीत देखील फरक पडतो. परंतु या चारही प्रकारापैकी अल्मास कॅवियार सगळ्यात महागडे असते.
याला जगातील सर्वात महागडा पदार्थ म्हणून ओळखले जाते व याची किंमत जर पाहिली तर ती 34 हजार अमेरिकन डॉलर्स इतकी असून भारतीय चलनानुसार एक किलो अल्मास कॅव्हीआरकरिता 28 लाख 74 हजार रुपये लागतात. याची एवढी मोठी किंमत असण्यामागील प्रमुख कारण म्हणजे ते इराणी बेलुगा स्टर्जन माशापासून मिळवले जाते व या बेलुगा कॅवियारची किंमत वीस लाख रुपये प्रति किलो इतकी आहे.
जर आपण बेलुगा स्टर्जन माशाचा विचार केला तर त्याचे वय शंभर वर्षांपेक्षा जास्त असते. हा मासा प्रामुख्याने इराण जवळील कॅस्पियन समुद्रामध्ये आढळून येतो व ही फार दुर्मिळ अशी माशांची प्रजात आहे. अल्मास कॅविआर हे दिसायला छोट्या मण्यासारखे दिसते व त्याची चव खारट अक्रोडासारखे लागते.
याबाबतीत आपण क्लिव्हलँड क्लिनिकचा अहवाल पाहिला तर त्यानुसार यामध्ये विटामिन बी 12 चे प्रमाण जास्त असते व शरीरातील सर्व अंतर्गत प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी खूप मदत करते. विटामिन बी 12 मुळे शरीराचा थकवा दूर होण्यास मदत होते व या अलमास कॅवियारमध्ये ओमेगा तीन फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असते व त्यामुळे बुद्धी चाणाक्ष राहते.