स्पेशल

काय सांगता चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले….‘बेटी बचाव, बेटी पटाव’

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  ब्रह्मा कुमारींनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना संबोधित केले. नागरिकांना संबोधित करताना त्यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ऐवजी ‘बेटी बचाव, बेटी पटाव,’ म्हटल्यानं त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय स्तरावर लोकांना संबोधित करताना एका घोषणेचा चुकीच्या पद्धतीने उच्चार केल्याने त्यातून चुकीचा संदेश जातो, अशी टीका त्यांच्यावर होत आहे. झालं असं की मोदी ‘बेटी बचाओ, बेटी पटाओ’ या योजनेच्या यशाबद्दल सांगत होते.

यावेळी बोलताना ते ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ऐवजी ‘बेटी बचाव, बेटी पटाव,’ असं म्हणाले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर, व्हायरल व्हिडीओवरून नेटकरी त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत.

‘आज पुन्हा टेलीप्रॉम्टर बंद पडला का,’ असा प्रश्न विचारत त्यांची खिल्ली उडवण्यात येत आहे. मोदीजी बोलता बोलता त्यांच्या ‘मन की बात’ बोलून गेले, असं म्हणत एका युजरने त्यांना ट्रोल केलंय.त्यांच्या याबोलण्याने घोषणेचा पूर्ण अर्थ बदलला आणि त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

काँग्रेस नेते श्रीनिवास बीव्ही यांनी देखील मोदींचा हा व्हिडीओ ट्वीट करत त्यांच्यावर निशाणा साधलाय. ‘टेलीप्रॉम्टरवर वाचूनही हे काय बोलून गेले मोदीजी, थोडी तरी लाज ठेवा,’ असं कॅप्शन टाकत त्यांनी पोस्ट टाकली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: PM modi

Recent Posts