स्पेशल

सिबिल स्कोर म्हणजे काय ? किती स्कोर असला म्हणजे मिळत लगेच लोन, वाचा याबाबत सविस्तर

What Is Cibil Score : अनेकांचा प्रश्न असतो की सिबिल स्कोर म्हणजे काय? तर आज आपण या प्रश्नाचं सखोल उत्तर जाणून घेणार आहोत. तसेच किती सिबिल स्कोर असला म्हणजेच कर्ज मिळण्यास सोपे होते याबाबत देखील थोडक्यात जाणून घेणार आहोत. वास्तविक ज्या लोकांनी यातही पर्सनल लोन, बिझनेस लोन, गृह कर्ज इत्यादी प्रकरचे कर्ज घेतलेले असेल त्यांना सिबिल स्कोर बाबत माहितीच असेल.

मात्र ज्यांनी अद्याप बँकेकडून लोन घेतलेले नाही त्यांना कदाचित सिबिल स्कोर बाबत ठाऊक नसेल. अथवा ज्यांनी कर्ज घेतल आहे पण त्यांना सिबिल स्कोर बाबत ठाऊक नसेल अन याबाबत अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आजचा हा लेख अशा लोकांसाठी उपयोगी ठरणार आहे.

सिबिल स्कोर किंवा क्रेडिट स्कोर म्हणजे काय रे भाऊ

सिबिल स्कोर म्हणजेच क्रेडिट स्कोर हा व्यक्तीच्या कर्जाचा इतिहास सांगतो. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने एखाद्या वित्तीय संस्थेकडून घेतलेलं कर्ज त्या व्यक्तीने कशा पद्धतीने परतफेड केली आहे हे सिबिल स्कोर च्या माध्यमातून समजत असते. यासाठी सिबिल स्कोर हा 300 ते 900 यादरम्यान गणला जातो. म्हणजे कमी सिबिल स्कोर असला तर संबंधित व्यक्तीने कर्ज परतफेड करताना, क्रेडिट कार्डचे देयके देताना किंवा इतर कर्ज हफ्ते वेळेवर फेडलेले नाहीत असं गृहीत धरल जात. तसेच जर एखाद्या व्यक्तीचा सिबिल स्कोर हा अधिक असेल तर त्या व्यक्तीची क्रेडिट हिस्ट्री चांगली आहे असा अर्थ लावला जातो.

तज्ञ लोकांच्या मते क्रेडिट स्कोर किंवा सिबिल स्कोर हा 750 पेक्षा पुढे असल्यास अशा व्यक्तीची क्रेडिट हिस्टरी चांगली राहते आणि वित्तीय संस्था अशा लोकांना कर्ज देण्यास उत्सुक असतात. या लोकांना लवकर कर्ज मंजूर होतं मात्र कागदपत्रे आणि इतर अन्य पात्रता बिल स्कोर चांगली असलेल्या व्यक्तीला देखील लागू असतात. त्यामुळे सिबिल स्कोर चांगला असला की लगेचच मोठ कर्ज मंजूर होतं असं नाही.

मात्र कर्जाची मंजुरी करण्यात जे वेगवेगळे फॅक्टर काम करत असतात त्यापैकीच सिबिल स्कोर हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे.

आता तुम्ही म्हणत असाल हा क्रेडिट स्कोर किंवा सिबिल स्कोर कोण ठरवतं? मी आपणास सांगू इच्छितो की सिबिल स्कोर हा पूर्वीच क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड ज्याला आता ट्रान्स युनियन सिव्हिल लिमिटेड असं संबोधलं जातं यांच्याद्वारे हा सिबिल स्कोर तयार केला जातो. सिबिल स्कोर हा प्रामुख्याने गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड घेण्यासाठी अति महत्त्वाचा असा घटक आहे. त्यामुळे सिबिल स्कोर चांगला असणे आणि तो चांगला ठेवणे निश्चितच अतिआवश्यक बाब आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts