स्पेशल

मोटिवेशनल स्पीकर आणि प्रसिद्ध युट्युबर विवेक बिंद्राचे शिक्षण किती झालयं ? पहा…

Motivational Speaker Vivek Bindra Education : गेल्या काही दिवसांपासून मोटिवेशनल स्पीकर आणि प्रसिद्ध youtuber विवेक बिंद्रा सोशल मीडियामध्ये खूपच चर्चेत आले आहेत. चर्चेचे कारण मात्र त्यांचे मोटिवेशनल व्हिडीओ नसून ते एका विवादामुळे चर्चेत आहेत. सर्वात आधी त्यांच्यावर मोटिवेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी यांनी 500 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप लावला.

माहेश्वरी यांनी बिंद्रा यांच्यावर मल्टी लेवल मार्केटिंगचा वापर करून त्यांचा कोर्स चालवत असल्याचा मोठा आरोप केला. विशेष म्हणजे त्यांच्या कोर्समध्ये मनी बॅक गॅरंटी ही पॉलिसी असतानाही त्यांनी पैसे परत मागणाऱ्यांना पैसे परत केलेले नाहीत. माहेश्वरी यांनी हा आरोप लगावल्यानंतर याबाबत बिंद्रा यांच्यावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलेत. अशातच आता बिंद्रा यांची अडचण आणखी वाढली आहे.

बिंद्रा यांच्या मेव्हण्याने त्याच्या बहिणीवर अत्याचार केल्याचा आरोप लावला आहे. म्हणजेच बिंद्रा यांनी त्यांची धर्मपत्नी यानिका हिला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देखील करण्यात आली आहे. तक्रारीत विवेक बिंद्रा यांनी मारहाण केल्यामुळे त्यांची पत्नी यानिकाच्या कानाचा पडदा फाटला असून यामुळे तिला ऐकू येत नसल्याचे सांगितले गेले आहे.

विशेष म्हणजे बिंद्रा आणि यानिका यांचे लग्न एका महिन्याभरापूर्वीच झाले आहे. सध्या पोलीस याबाबत सविस्तर तपास करत आहेत. यामुळे आता विवेक बिंद्रा मोटिवेशनल व्हिडिओ मुळे नव्हे तर काही पारिवारिक आणि गंभीर आरोपांमुळे चर्चेत आले आहेत. दरम्यान सध्या सोशल मीडियामध्ये चर्चेत असलेल्या डॉक्टर विवेक बिंद्रा यांचे शिक्षण काय झाले आहे याविषयी तुम्हाला माहिती आहे का ?

कदाचित तुम्हाला याबाबत माहिती नसेल. यामुळे आज आपण डॉक्टर विवेक बिंद्रा यांचे शिक्षण नेमके किती झाले आहे याविषयी सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

बिंद्रा यांचे शिक्षण किती

बिंद्रा यांच्यावर त्यांच्या पत्नीसोबत मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात नोएडा मधील एका पोलिस ठाण्यात FIR नोंदवण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही एफ आय आर बिंद्रा यांच्या मेव्हण्याने दाखल केली आहे. सध्या पोलीस याबाबत तपास करत आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. बिग स्कॅम एक्सपोज नावाचा हा व्हिडिओ होता.

यामध्ये त्यांनी बिन्द्रा यांनी मल्टी लेवल मार्केटिंग चा कोर्स चालवण्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यातून त्यांनी जवळपास 500 कोटींचा स्कॅम केला असल्याचा मोठा दावा देखील माहेश्वरी यांनी केला आहे. परिणामी बिंद्रा हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. आता आपण बिंद्रा यांच्या शिक्षणाबाबत जाणून घेऊया. मीडिया रिपोर्टनुसार बिंद्रा यांचा जन्म दिल्लीत झाला आहे.

1982 ला जन्मलेले बिंद्रा यांनी दिल्ली येथील सेंट झेवियर्स स्कूल येथून त्यांचे सुरवातीचे शिक्षण पूर्ण केले आहे. यानंतर त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीच्या किरोडीमल कॉलेज येथून कॉमर्स ची डिग्री घेतली. येथून त्यांनी बीकॉम चे शिक्षण घेतल्यानंतर नोएडा येथील एमिटी युनिव्हर्सिटी मधून त्यांनी एमबीए केले आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी फिलॉसॉफी मधून पीएचडीची डिग्री देखील घेतली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts