स्पेशल

Wheat Crop Management : शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ! गहू पिकावर आला ‘हा’ भयंकर रोग, असं मिळवा नियंत्रण, नाहीतर……

Wheat Crop Management : देशात रब्बी हंगाम प्रगतीपथावर असून शेतकरी बांधव हंगामातील पीक नियोजनात व्यस्त आहेत. खरं पाहता, आपल्याकडे रब्बी हंगामात गव्हाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. मात्र सध्या वातावरणात होत असलेल्या बदलामुळे गहू पिकावर रोगांचे सावट पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोड पुन्हा एकदा वाढत असला तरी देखील दिवसा तापमानात वाढ होत आहे.

या अशा दमट वातावरणामुळे गहू पिकावर खोडकीड प्रामुख्याने पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत खोडकिडीवर जर वेळेत नियंत्रण मिळवलं गेलं नाही तर गहू उत्पादकांना याचा मोठा फटका बसू शकतो आणि उत्पादनात मोठी घट होऊ शकते. परिणामी जाणकार लोकांनी गहू उत्पादकांना लवकरात लवकर या कीटकावर नियंत्रण मिळवण्याचा सल्ला दिला आहे.

गहू पीक आता परिपक्व होण्याच्या अवस्थेत असले तरी देखील यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खोडकीड ही प्रामुख्याने गहू पिकाच्या आतील भागात आपली उपजीविका भागवत असते. पिकाच्या खोडा शिरून खोड किड आतील भाग पोखारत असल्याने गहू पीक सुकत असल्याचे चित्र आहे. गव्हाचे पीक फुलोरा अवस्थेत असताना याचा प्रादुर्भाव झाला तर लोंब्यात दाणे भरलें जाणार नाहीत.

परिणामी उत्पादनात घट होण्याची भीती आहे. प्रामुख्याने ज्या ठिकाणी गव्हाची उशिरा पेरणी झाली आहे या भागात खोडकिडीचा प्रादुर्भाव अधिक असल्याचे चित्र आहे. निश्चितच खोडकिडीमुळे गहू उत्पादनात मोठी घट होणार असल्याने या कीटकावर वेळीच नियंत्रण मिळवणे आता अनिवार्य बनले आहे. दरम्यान आज आपण या कीटकावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवले जाऊ शकते याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.

खोडकिडीवर मिळवा अशा पद्धतीने नियंत्रण 

या किडीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस घटक असलेले कीटकनाशक फवारण्याचा सल्ला जाणकारांकडून देण्यात आला आहे. हे कीटकनाशक 20 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी मात्र शेतकऱ्यांनी करावी असा सल्ला देण्यात आला आहे. तसेच खोडकिडीचा अधिक प्रादुर्भाव होत असलेल्या भागामध्ये उभ्या पिकातील कीडग्रस्त गव्हाचे रोपे आठवड्याच्या अंतराने २-३ वेळा मुळासकट उपटून नष्ट केली पाहिजेत. जेणेकरून या कीटकाचा नायनाट होईल.

तसेच, पिकाची कापणी झाल्यावर उपद्रवग्रस्त क्षेत्रातील धसकटे गोळा करून जाळावीत. याशिवाय सायपरमेथ्रिन (१० ई. सी.] १.१ मि.ली. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास या कीटकावर नियंत्रण मिळवले जाऊ शकते असं सांगितल गेलं आहे. मात्र पिकावर कोणत्याही औषधाची फवारणी करण्या अगोदर शेतकऱ्यांना तज्ञ लोकांचा सल्ला घेणे अपरिहार्य राहणार आहे.

मराठमोळ्या शेतकऱ्याचा नादखुळा ! 2 एकरात ‘या’ फुलाचीं केली लागवड, आता कमवतोय महिन्याकाठी 1 लाख, पहा ही भन्नाट यशोगाथा

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts