Wheat Farming : गहू हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात पिकवल जाणार एक मुख्य पीक आहे. गव्हाची शेती ही आपल्या राज्यासह संपूर्ण देशात रब्बी हंगामात प्रामुख्याने केली जाते. खरं पाहता गहू हे एक प्रमुख बागायती पिक असून या पिकासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता आवश्यक असते. या पिकाला अधिक पाणी लागत असल्याने केवळ बागायती क्षेत्रातच याची लागवड पाहायला मिळते.
विशेष म्हणजे कोरडवाहू भागात याची पेरणी केली तर खूपच कमी उत्पादन यापासून मिळत असते. अशातच जर आम्ही तुम्हाला गहू पीक विना पाण्याचही येऊ शकतं असं सांगितलं तर, तर कदाचित आपला विश्वास बसणार नाही. पण राजस्थान मध्ये असे एक गाव आहे ज्या ठिकाणी गव्हाच्या पिकाला पाणी न भरताच चांगले दर्जेदार उत्पादन तेथील शेतकरी घेत आहेत. आता हा चमत्कार कसा होतोय नेमकी यामागील सत्यता काय याबाबत आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील जहांगीरपुर या गावात जवळपास 250 हेक्टर शेत जमिनीवर गव्हाची शेती केली जाते. विशेष म्हणजे या जमिनीवरील गहू पिकाला पाणी भरले जात नाही. म्हणजेच पाण्याविनाच इथे गहू उत्पादित केला जात आहे. तेथील ग्रामस्थ सांगतात की, गावाची आणि आजूबाजूची जमीन ही गोड आणि गुळगुळीत आहे. जमीन गुळगुळीत असल्याने पावसाचे पाणी ही जमीन शोषून ठेवते त्याचे बाष्पीभवन होऊ देत नाही.
पाण्याचे बाष्पीभवन जमिनीतून होत नसल्याने त्या ठिकाणी रब्बी हंगामातील गव्हाचे पीक पाण्याविनाच घेणे शक्य होत असल्याचे मत तेथील शेतकरी व्यक्त करत आहेत. वास्तविक गव्हाच्या पिकाला मोठ्या प्रमाणात पाणी लागते. इतर पिकांच्या तुलनेत चार ते पाच पट अधिक पाणी या पिकाला लागत असते. मात्र या ठिकाणी चक्क पाण्याविनाश गव्हाची शेती होत असल्याने याची माहिती कृषी शास्त्रज्ञांना मिळताच त्यांनी त्या गावातील जमिनीचा नमुना तपासण्यास घेतला.
तपासणी मध्ये केवळ जमीन ही गुळगुळीत असून या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असल्याचे उघडकीस आले आहे.या जमिनीत पाणी अधिक काळ साठवून राहत असल्याने गव्हाचे पीक पाण्याविना पिकत असल्याचा दावा केला जात आहे. देशात एकीकडे पाण्या वाचून गव्हाचे पीक करपते तर या जमिनीत पाणी न भरताच गव्हाचे पीक उत्पादित होते यामुळे सध्या या गावाची आणि पाण्या वाचून तयार होणाऱ्या या गव्हाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. लोक सांगतात की या जमिनीत तयार होणारा गहू आरोग्याच्या दृष्टीने देखील खूपच फायदेशीर आहे.