Wheat Farming : गहू हे रब्बी हंगामात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे. या पिकाची संपूर्ण भारतभर लागवड पाहायला मिळते. भातसमवेत खरीप हंगामातील मुख्य पिकांची काढणी झाल्यानंतर गव्हाची लागवड केली जाते. गेल्या वर्षी कमी पाऊस असतानाही देशातील विविध भागांमध्ये गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती. यंदा तर पाऊसमान खूपच चांगला आहे.
यामुळे यंदा गव्हाची लागवड वाढणार असे बोलले जात आहे. गव्हाची पेरणी ही पुढील महिन्यापासून अर्थातच ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणार आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यापासून गव्हाच्या पेरणीला सुरुवात होणार आहे.
महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर आपल्या राज्यात एक नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान गव्हाची पेरणी करणे योग्य समजले जाते. या काळात गव्हाची पेरणी केली तर शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादन मिळू शकते. हा कालावधी वेळेवर गहू लागवड करण्यासाठी सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा केला जातो.
म्हणजेच गहू पेरणीची वेळ आता जवळ येऊ लागली आहे. दुसरीकडे भारतीय कृषी शास्त्रज्ञांनी उत्पादनात वाढ व्हावी या अनुषंगाने अलीकडील काही वर्षांमध्ये गव्हाच्या नवनवीन जाती शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.
अलीकडेच भारतीय कृषी शास्त्रज्ञांनी गव्हाची एक नवीन जात विकसित केली आहे. या जातीला एचडी 3385 या नावाने ओळखले जात आहे. आज आपण याच गव्हाच्या जातीच्या विशेषतः अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
एचडी 3385 गव्हाच्या विशेषता खालील प्रमाणे
कर्नाल येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेने गव्हाची ही नवीन जात विकसित केली आहे. उत्तर पश्चिम आणि उत्तर पूर्व मैदानी भागासाठी गव्हाची ही जात विकसित करण्यात आली असून या भागातील शेतकऱ्यांसाठी या जातीची शिफारस केली जात आहे.
ही जात प्रामुख्याने वेळेवर पेरणी करण्यासाठी शिफारशीत असून उशिराने पेरणी केल्यास उत्पादनात घट येण्याची भीती आहे. ही जात वेगवेगळ्या रोगांमध्ये प्रतिकारक असल्याचे आढळले आहे. गहू पिकात तांबेरा रोगाचा नेहमीच मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव पाहायला मिळतो.
तांबेरा रोगामुळे गव्हाचे उत्पादन घटते. मात्र गव्हाची ही नवीन जात तांबेरा रोगासाठी प्रतिकारक असून या जातीपासून शेतकऱ्यांना सरासरी 60 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जात आहे.
मात्र या जातीची कमाल उत्पादनक्षमता 80-100 क्विंटल पर्यंत असल्याचा दावा येथील शास्त्रज्ञांनी केला आहे. मात्र 100 क्विंटल पर्यंतचे जर उत्पादन हवे असेल तर यासाठी गव्हाच्या पिकाचे नियोजन योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे.
हवामान, जमीन, पाणी आणि खत व्यवस्थापन 100% परफेक्ट असेल तर 100 क्विंटल पर्यंतचे उत्पादन घेता येऊ शकते. एकंदरीत शेतकऱ्यांना या जातीपासून सरासरी 60 ते 70 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते अस म्हणायला काही हरकत नाही.