Wheat Farming : सध्या देशभरात रब्बी हंगामातील गहू या मुख्य पिकाची काढणी म्हणजेच हार्वेस्टिंग प्रगतीपथावर असून अनेकांची गहू काढणीची कामे पूर्ण झाली आहेत. ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर गव्हाची पेरणी केली होती त्या शेतकऱ्यांचा गहू काढणी झाला आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी उशिरा गव्हाची पेरणी केली होती त्यांचा गहू अद्याप काढणे झालेला नाही. येत्या काही दिवसात मात्र देशभरातील जवळपास सर्वच गहू उत्पादकांचे गहू काढले जाणार आहेत. गहू हे रब्बी हंगामातील एक मुख्य पीक असून या पिकाची जवळपास संपूर्ण देशात शेती केली जाते.
यामध्ये आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात लागवड होते आणि या पिकातून राज्यभरातील शेतकरी चांगली कमाई करत आहेत. दरम्यान, संभाजीनगर जिल्ह्यातून गव्हाच्या शेतीमधला भन्नाट प्रयोग समोर येत आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने गव्हाच्या शेतीतून तब्बल 76 क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळवण्याची किमया साधली आहे. यामुळे सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याची पंचक्रोशीत चर्चा पहावयास मिळत आहे.
दरम्यान आज आपणही या प्रयोगशील शेतकऱ्यांनी नेमकी ही किमया कशी साधली याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील शेतकरी राजू आसाराम हारदे यांनी आपल्या गव्हाच्या शेतीतून हेक्टरी 76 क्विंटल उत्पादन मिळवले आहे. राजू यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे 35 एकर जमीन आहे. ते आपल्या जमिनीत कायमच नवनवीन प्रयोग करत असतात. विशेष म्हणजे शासकीय योजनेचा लाभ घेऊन त्यांनी आपली शेती समृद्ध केली आहे.
पोकरा या शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनेंतर्गत त्यांनी शेततळी, ठिबक सिंचन, शेडनेट आदी बाबींसाठी अनुदान घेऊन शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. विशेष बाब म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कशा पद्धतीने शेतीतून चांगली कमाई केली जाऊ शकते यासाठी त्यांना कृषी विभागाचे देखील मार्गदर्शन मिळते. दरम्यान राजू यांनी रब्बी हंगामातील पीक स्पर्धेत गहू या पिकातून 76 क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळवत राज्यात सर्वाधिक गहू उत्पादन मिळवण्याचा बहुमान पटकावला आहे.
हे पण वाचा :- काय सांगता ! फक्त ‘ही’ तीन कामे केली की लगेचच सुधारतो सिबिल स्कोर, पहा कोणती आहेत ही कामे?
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना गहू कॅटेगिरीमध्ये कृषी उत्पादन स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार त्यांनी या स्पर्धेत सहभाग नाेंदविला हाेता. आता या स्पर्धेत त्यांचा प्रथम क्रमांक आला आहे. राजू सांगतात की, केशवपुष्प ऍग्रो इंडिया कंपनीचे 20 किलो बियाणे वापरुन अर्धा एकरवर गहू पेरला होता. मात्र त्यांनी पारंपारिक पद्धतीने गव्हाची पेरणी करण्याऐवजी टोकन पद्धतीने गहू लागवड केला. चार इंच अंतरावर दोन कोंब या पद्धतीने टोकन करण्यात आले.
ते सांगतात की दोन सरींच्या मध्यात 12 इंचाचे अंतर त्यांनी ठेवले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेरणीपूर्वी पाच ट्रॉली शेणखत टाकले होते. पेरणीनंतर बुरशीनाशक, तणनाशकची प्रत्येकी एक फवारणी केली. एक गोणी डिएपी तर एक गोणी युरीयाची टाकली होती. प्रती गुंठा ७८ किलो याप्रमाणे २० गुंठे क्षेत्रात१६ क्विंटल उत्पादन त्यांना मिळाले. म्हणजे हेक्टरी 76 क्विंटल पर्यंतचे उत्पादन त्यांनी काढून दाखवलं आहे. योग्य नियोजन केलं तर शेतीतून चांगली कमाई होऊ शकते हेच या प्रयोगातून सिद्ध होत आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; धानाच्या ‘या’ नवीन जाती ठरतील फायदेशीर, मिळणार अधिक उत्पादन