Wheat Farming : गहू हे राज्यातील रब्बी हंगामातील एक प्रमुख पीक आहे. येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात गव्हाची पेरणी सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण गव्हाच्या अशा काही सुधारित जाती जाणून घेणार आहोत ज्या की महाराष्ट्रातील हवामानातं चांगले दर्जेदार उत्पादन देण्यास सक्षम आहेत. खरे तर पुढील महिन्यापासून गव्हाची पेरणी सुरू होणार आहे.
राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये थोड्याफार प्रमाणात गव्हाची लागवड पाहायला मिळते. उत्तर महाराष्ट्रात देखील गहू पिकवला जातो. आपल्या राज्यात अनेक शेतकरी बांधव फक्त घरासाठी गव्हाची पेरणी करतात.
तर काही शेतकरी बांधव याची व्यावसायिक शेती देखील करतात. रब्बी हंगामात गहू आणि हरभरा या दोन पिकांची आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात लागवड पाहायला मिळते. चला तर मग वेळ न घाबरतात जाणून घेऊया गव्हाच्या सुधारित जाती.
ईगल 25 : महाराष्ट्रातील हवामान या जातीसाठी विशेष पूरक असल्याचे आढळून आले आहे. या जातीपासून राज्यातील शेतकऱ्यांना जवळपास एकरी 30 ते 35 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत आहे. या जातीचे सर्वात मोठे विशेषता म्हणजे हा वाण चपातीसाठी देखील योग्य आहे. म्हणजे उत्पादन तर चांगले मिळतेच सोबतच या जातीचा गहू खाण्यासाठी देखील बेस्ट आहे. यामुळे बाजारात याला चांगली मागणी आहे. या जातीपासून शेतकऱ्यांना नक्कीच चांगले उत्पन्न मिळणार आहे.
नर्मदा सागर : जर शेतकरी बांधवांना कमी खर्चात आणि कमी व्यवस्थापनात गव्हाच्या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर नर्मदा सागर ही जात फायदेशीर ठरणार आहे. नर्मदा सागर ही गव्हाची अशी जात आहे जी कमी व्यवस्थापनातही एकरी 18 क्विंटल पर्यंतचा उतारा देण्यास सक्षम आहे. महत्त्वाचे म्हणजे ही जात चपातीसाठी सर्वोत्कृष्ट आहे. उत्पादन थोडे कमी असले तरी देखील चपातीसाठी हा वाण उत्कृष्ट असल्याने या जातीची अनेक जण लागवड करतात.
गंगा कावेरी सीड चा 7777 : ज्या शेतकरी बांधवांना गव्हाची व्यावसायिक लागवड करायची असेल त्यांनी या जातीची निवड केली पाहिजे. कारण की या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले विक्रमी उत्पादन मिळणार आहे. महाराष्ट्रातील हवामान या जातीसाठी विशेष अनुकूल आहे. या जातीपासून विक्रमी उत्पादन मिळते खरे पण चपातीसाठी हा वाण फारसा चांगला नाही.
2189 : गव्हाची ही देखील एक सुधारित आणि महाराष्ट्रातील हवामानात तग धरणारी आणि विक्रमी उत्पादन देणारी एक प्रमुख जात आहे. या जातीपासून शेतकऱ्यांना पंधरा गुंठ्यात आठ ते दहा क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळाले आहे. म्हणजेच एकरी 25 क्विंटल प्लस उत्पादन मिळू शकणार आहे. महत्त्वाचे म्हणजे गव्हाची ही जात चपातीसाठी सर्वात बेस्ट आहे.
श्रीराम सुपर 111 : गव्हाची ही देखील एक सुधारित जात आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रात या जातीची पेरणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या जातीचा गहू जास्त वाढत नाही. यापासून शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादन मिळते. मात्र काढणीच्या वेळी ओंबी फुटते. यामुळे या जातीचे पीक परिपक्व झाल्यानंतर लवकरात लवकर हार्वेस्टिंग करणे आवश्यक आहे. नाहीतर नुकसान होण्याची शक्यता अधिक असते.