Wheat Variety : सध्या देशात रब्बी हंगाम सुरु आहे. संपूर्ण देशात रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका इत्यादी पिकांची पेरणी केली जात आहे. गव्हाच्या शेतीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या पिकाचे उत्पादन वाढवायचे असते.
जेणेकरून त्याला जास्तीत जास्त नफा मिळू शकेल. म्हणूनच तो पिकाच्या रोग प्रतिरोधक आणि भरघोस उत्पन्न देणाऱ्या वाणांची निवड करतो. वास्तविक, गव्हाच्या अनेक सुधारित जाती बाजारात पाहायला मिळतील.
कर्नाल येथील गहू आणि बार्ली संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी गव्हाच्या लागवडीसाठी पाच नवीन उच्च-उत्पादक जाती विकसित केल्या आहेत, ज्यांना भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) मान्यता दिली आहे.
येत्या ऑक्टोबर महिन्यातील पेरणीच्या हंगामापासून या जातींचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. दरम्यान आता आपण या सुधारित जातींची थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
DBW-370 : DBW-370 ही भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेली गव्हाची एक सुधारित जात आहे. ही उच्च उत्पन्न देणारी जात आहे. DBW-370 हे भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) द्वारे विकसित करण्यात आली आहे.
तसेच गहू संशोधन संचालनालय (DWR), कर्नाल, हरियाणा, भारत यांनी प्रसिद्ध केली आहे. गव्हाच्या या जातीचा वापर प्रामुख्याने चपाती आणि इतर गव्हावर आधारित अन्नपदार्थ बनवण्यासाठी केला जातो.
ही एक उच्च उत्पन्न देणारी गव्हाची जात आहे. गव्हाच्या अनेक आधुनिक जातींप्रमाणे, DBW-370 ही सुद्धा रोगांसाठी काही प्रमाणात प्रतिकारक आहे.
DBW-372 : DBW-372 जातीच्या गव्हाची उत्पादन क्षमता 84.9 क्विंटल प्रति हेक्टर इतकी आहे. या जातींचे सरासरी उत्पादन ७५.३ क्विंटल प्रति हेक्टर आहे. ही जात १५१ दिवसांत पक्व होते.
भारतीय गहू संशोधन संस्था, कर्नालच्या शास्त्रज्ञांनी गव्हाची ही जात विकसित केली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये याची लागवड होत आहे. प्रमुख गहू उत्पादक राज्यांमध्ये याची मोठी प्रमाणात लागवड होत आहे.