Depreciation Insurance:- वाहनांच्या बाबतीत इन्शुरन्स घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. ते जसे कायदेशीर दृष्ट्या आवश्यक आहे. तसे एखाद्या अपघातामध्ये जर वाहनाचे नुकसान झाले तर त्याकरिता अत्यंत आवश्यक आहे. कुठलेही वाहन म्हटले म्हणजे ते रस्त्यावर धावत असते व बऱ्याचदा काही कारणांमुळे अपघात होण्याची शक्यता असते अशावेळी वाहनाचे मोठे नुकसान होते.
अशा नुकसानीमध्ये वाहनाच्या मेंटेनन्स वर मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो व त्या खर्चापासून जर तुम्हाला वाचायचे असेल तर इन्शुरन्स शिवाय पर्याय नसतो. त्यामुळे वाहन घेताना त्यावरील इन्शुरन्स घेणे खूप गरजेचे असते. हीच बाब कारच्या बाबतीत देखील लागू होते व कार खरेदी करताना कार इन्शुरन्स खूप महत्त्वाचा असतो.
अपघातामध्ये जर कारचे काही नुकसान झाले तर कार इन्शुरन्सच्या साह्याने आपल्याला आर्थिक भरपाई मिळू शकते व त्यामुळे आपल्याला जो काही आर्थिक फटका बसणारा असतो त्यापासून आपला बचाव होतो.
परंतु कार इन्शुरन्स मध्ये अनेक प्रकार आणि काही संकल्पना आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये जर आपण एक संकल्पना बघितली तर यामध्ये झिरो डेप्रिसिएशन संकल्पना फार महत्वाची आहे व याला झिरो डेप असे देखील म्हटले जाते. वाहनांवरील थर्ड पार्टी इन्शुरन्स पेक्षा हा इन्शुरन्स थोडा वेगळा आहे व त्यातून वाहनाच्या मालकाला खूप काही फायदे मिळू शकतात.
झिरो डेप इन्शुरन्स म्हणजे नेमके काय? कोणते नुकसान होते त्यामध्ये कव्हर?
समजा दुर्दैवाने जर कारचा अपघात झाला त्यामध्ये जे काही कारचे नुकसान होते त्या नुकसानीकरिता 100% इन्शुरन्स कव्हर मिळते व त्याला झिरो डेप्रिसिएशन कव्हर असं देखील म्हटले जाते. म्हणजेच या प्रकाराच्या विम्यामध्ये विमा कंपनीकडून वाहनांचे जे काही पार्ट असतात त्याचे डेप्रिसिएशन वजा केले जात नाही.
परंतु त्या तुलनेत कॉम्प्रेहेन्सिव्ह विमा असेल तर त्यामध्ये कारच्या बदललेल्या भागांचे डेप्रिसिएशन व्हॅल्यू कमी केली जाते. झिरो डेप इन्शुरन्स मध्ये अपघात किंवा वाहनाचे नुकसान झाले तर जवळपास कारच्या सर्व पार्ट वर विमा संरक्षण दिले जाते. परंतु कारची इंजिन, बॅटरी तसेच कारचे टायर ट्यूब आणि काचा इत्यादींना कव्हर मिळत नाही.
विंडस्क्रीन वगैरेच्या नुकसानीचा खर्चही काही कंपन्या उचलत असल्या तरी तो असा विमा पॉलिसीचा भाग मात्र नसतो. झिरो डेप इन्शुरन्सचा एक सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला शंभर टक्के डॅमेज कव्हर मिळते. जेव्हा क्लेम सेटलमेंट केले जाते तेव्हा ग्राहकाला पूर्ण कव्हरेज मिळते.
इतकेच नाही तर नुकसान झाल्यानंतर जर सेवा दिली तर ग्राहकाला डेप्रिसिएशनचा खर्चाचा तोटा सहन करावा लागत नाही. ज्या आरामदायी कार असतात त्या कारच्या सेवेकरिता याचा खूप उपयोग होतो. यामध्ये तुमचा क्लेम सेटल करताना इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून तुमच्या कारच्या सर्व पार्टचे पैसे दिले जातात. झिरो डिप्रिसिएशन मुळे ग्राहकावर खर्चाचा बोजा पडत नाही.