Home Loan News : आपल्यापैकी अनेक जण स्वप्नांच्या घर निर्मितीसाठी होम लोनचा पर्याय स्वीकारतात. खरे तर घरांच्या किमती एवढ्या वाढल्या आहेत की आता रोकड घर घेणे म्हणजेच जवळपास अशक्य बाब आहे.
सर्वसामान्यांना आता घर घेण्यासाठी होम लोन घ्यावेच लागत आहे. विशेष म्हणजे तज्ञ लोक देखील गृह कर्ज घेण्याचा पर्याय वाईट नसल्याचे बोलत आहेत. दरम्यान गृह कर्ज घेणाऱ्यांसाठी या नवीन वर्षात एक मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वर्ष 2024 मध्ये गृह कर्जाच्या व्याजदरात मोठी कपात होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मीडिया रिपोर्ट मध्ये याबाबतचा दावा देखील केला जात आहे. देशातील अनेक बँकर्सने देखील गृह कर्जाच्या व्याजदरात कपात होणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
यावर्षी गृह कर्जाचे आणि वाहन कर्जाचे व्याजदर कमी होणार आहेत. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हे व्याजदर 0.5% ते 1.25 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात. गेल्या दीड वर्षात आरबीआयने रेपो रेट तब्बल अडीच टक्क्यांनी वाढवला आहे. याचा परिणाम म्हणून विविध कर्जांचे व्याजदर झपाट्याने वाढले आहेत.
आता मात्र आरबीआय रेपो रेटमध्ये कपात करणार आहे. यामुळे गृह कर्ज, वाहन कर्ज यांचे व्याजदर देखील कमी होणार आहेत. दरम्यान आता आपण गृह कर्जाच्या व्याजदरात केव्हा कपात होऊ शकते याबाबत तज्ञ लोकांनी काय मत व्यक्त केले आहे याविषयी जाणून घेणार आहोत.
गृह कर्जाच्या व्याजदरात केव्हा होणार कपात ?
बँक ऑफ महाराष्ट्रचे एमडी आरए राजीव यांनी या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या माध्यमातून जून जुलै 2024 मध्ये रेपो रेटमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. असे झाले तर गृहकर्जाच्या व्याजदरात देखील कपात होणार आहे.
दुसरीकडे कॅनडा बँकेचे कार्यकारी संचालक भावेन्द्र कुमार यांनी सुद्धा या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. कुमार यांनी म्हटल्याप्रमाणे, काही बँकांनी गृह कर्जाचे व्याजदर कमी करण्यास सुरुवात केली आहे. महागाई कमी झाली असल्याने बँकांनी हा निर्णय घेतला आहे.