Ajab Gajab News : शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांची हलगर्जी सर्वज्ञात आहेच. कधी पोटात कापसाचा बोळाच विसर… कुठे कात्रीच शस्त्रक्रियेच्या ठिकाणी ठेवून द्यायची. पण वॉशिंग्टन मेडिकल सेंटरमधल्या डॉक्टरांनी कर्करोगाने त्रस्त रुग्णाच्या अॅपेंडिक्सच्या ऐवजी मोठ्या आतड्याचा मोठा तुकडा कापून काढला.
मरणाच्या दारापासून दूर आलेल्या रुग्णाला डॉक्टरांनी आता थेट दारातच आणून उभे केले आहे. डॉक्टरांच्या या हलगर्जीविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्याचे या वयस्कर डॉक्टरने ठरवले आहे.
जॉर्ज पिआय असे या रुग्णाचे नाव आहे. त्यांना कर्करोग आहे. त्यातच त्यांचा अॅपेंडिक्स बळावला. त्यावर शस्त्रक्रिया हाच उपाय असल्याने त्यांना वॉशिंग्टन मेडिकल रुग्णालयात दाखल केले.
शस्त्रक्रियेनंतरही जॉर्ज यांचे दुखणे काही कमी झाले नाही. तपासणीदरम्यान भलतीच गोष्ट उघड झाली. डॉक्टरांनी त्यांच्या मोठ्या आतड्याचा हातभर लांब भागच कापून काढला.
यामुळे त्यांच्या पोटात गळती सुरू झाली आणि त्यामुळे जंतुसंसर्ग वाढू लागला. शस्त्रक्रियेपूर्वीपेक्षा त्यांची अवस्था खूपच दयनीय झाली. या शस्त्रक्रियेमुळे त्यांना कर्करोगावर उपचार घेता येत नसल्याने त्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.
बांधकाम मजूर असलेल्या जॉर्ज यांच्या वकिलाने अशा प्रकारचा हा काही पहिलाच खटला नाही. डॉक्टरांच्या हलगर्जीला शाबित करता आले तर जॉर्ज यांना पाच लाख ते तीन कोटी रुपये मिळतील.
किंग काऊंटी सुपिरियर कोर्टात या संबंधीचा खटला दाखल झाला आहे. अशा प्रकारे इतर कुणाची अवस्था होऊ नये यासाठी हा खटला दाखल केल्याचे जार्ज यांनी सांगितले.