गुंतवणुकीचे जे काही पर्याय उपलब्ध आहेत त्यापैकी सर्वात सुरक्षित पर्याय आणि चांगला परतावा मिळण्याच्या दृष्टिकोनातून बँकेच्या आणि पोस्ट ऑफिसच्या योजनांना प्रामुख्याने गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते. गुंतवणूक ही संकल्पना आर्थिक समृद्धीच्या दृष्टिकोनातून आणि उत्तम असे जीवन जगण्याच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचे असून
त्यामुळे आता गुंतवणुकीकडे बऱ्याच जणांचा कल मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे. यामध्ये अनेक जण बँकेमध्ये एफडी करण्याला प्राधान्य देतात व त्यानंतर पोस्ट ऑफिसच्या योजनांना महत्व दिले जाते. परंतु यामध्ये जर तुलनात्मक दृष्ट्या विचार केला तर पोस्ट ऑफिसच्या काही योजना या बँक एफडी योजनांपेक्षा चांगला व्याजदर देतात व परतावा देखील जास्त मिळतो.
पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना
पोस्टात ऑफिसच्या अनेक योजनांपैकी पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट ही योजना उत्तम व्याज देणारी योजना म्हणून ओळखली जाते. विशेष म्हणजे यामध्ये गुंतवणूक सुरक्षित राहतेच परंतु या माध्यमातून हमी परतावा देखील मिळतो. त्या पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजनेच्या माध्यमातून पाच वर्षाच्या गुंतवणुकीवर 7.5% व्याज दिले जात आहे.
विशेष म्हणजे या योजनेत सर्व गुंतवणूकदारांकरिता व्याजदर हा समान आहे. म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना पाच वर्षाच्या कालावधी करिता 7.5% व्याजदर मिळतो तर ज्येष्ठ नागरिकांना देखील तितकाच मिळतो. हे व्याज दरवर्षी दिले जाते. परंतु व्याजाची मोजणी त्रैमासिक होते.
तसेच तुम्ही ही योजना तिच्या मुदतीपूर्वी देखील बंद करू शकतात. परंतु यामध्ये नुकसान असे होते की, तुम्हाला कमी व्याजदर मिळतो किंवा कमी व्याज मिळते. समजा तुम्ही चार वर्षानंतर पैसे काढले तरी तुम्हाला चार टक्के दराने व्याज मिळते. म्हणजे पूर्ण पाच वर्षे कालावधी करिता गुंतवणूक केली तरच या योजनेत 7.5% व्याजदर मिळतो.
बँक एफडीमध्ये किती व्याज मिळते?
पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट स्कीमच्या तुलनेत जर आपण बँक एफडीवर येणाऱ्या व्याजाच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये वेगवेगळे व्याजदर आहेत. त्यातील प्रमुख मोठ्या बँका पाच वर्षात परिपक्व होणाऱ्या एफडी वर सात टक्के व्याज देतात.
दुसरे नुकसान म्हणजे यामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी इतरांना मिळणाऱ्या व्याजदरामध्ये तफावत आढळून येते. त्यामुळे बँक एफडी पेक्षा पोस्ट ऑफिसच्या या टर्म डिपॉझिट योजनेतील गुंतवणूक फायद्याची ठरते.