स्पेशल

हिल स्टेशन बघायला कशाला जातात इतरत्र! महाराष्ट्रातच आहे निसर्गाने नटलेले सुंदर असे हिल स्टेशन; कुटुंब आणि मित्रांसोबत फिरायला आहे बेस्ट ऑप्शन

Hill Station In Maharashtra:- महाराष्ट्र म्हटला म्हणजे निसर्गाचा समृद्ध ठेवा असलेली भूमी म्हटले तरी ते वावगे ठरू नये. महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये किंवा कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही गेलात तरी तुम्हाला निसर्गाने भरभरून दिलेले आणि निसर्ग सौंदर्याने नटलेली अनेक पर्यटन स्थळे पाहायला मिळतात.

यामध्ये तुम्हाला उंचच उंच डोंगर रांगा असेच गड किल्ले, मनमोहक असे खळाळून वाहणारी धबधबे आणि मनाला प्रसन्न करतील अशी हिल स्टेशन यांचा समावेश करता येईल. त्यामुळे सुट्ट्यांमध्ये किंवा कुठल्याही ऋतूमध्ये बरेच जण कुटुंब किंवा मित्र तसेच जोडीदारासोबत फिरायला जायचा प्लान करतात व यामध्ये आवडेल त्या ठिकाणी जाऊ शकतात.

महाराष्ट्रामध्ये हिल स्टेशन देखील मोठ्या प्रमाणावर असून तुम्हाला देखील अशाच प्रकारे कुटुंब किंवा मित्रांसोबत हिल स्टेशनला भेट द्यायची असेल तर तुम्ही महाबळेश्वर किंवा माथेरान पेक्षा नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ या हिल स्टेशनला भेट देऊ शकता. हे एक निसर्गाच्या सानिध्यात असलेले शांत आणि तुमच्या बजेटमध्ये फिरता येईल असे ठिकाण आहे.

तोरणमाळ आहे निसर्गाने नटलेले हिल स्टेशन
निसर्गाच्या सानिध्यामध्ये नटलेले आणि शांत व तुमच्या बजेटमध्ये फिरता येईल असे हे हिल स्टेशन म्हणजे तोरणमाळ हिल स्टेशन होय. हे हिल स्टेशन नंदुरबार जिल्ह्यात असून या ठिकाणी तुम्हाला ट्रेकिंग तसेच कॅम्पिंग देखील करता येते व ट्रेकिंगची तुम्हाला आवड असेल तर तुमच्याकरिता तोरणमाळ हा एक चांगला ऑप्शन आहे.

तुम्हाला जर ट्रेक करायचा असेल तर या ठिकाणी असलेल्या सीताखाई ट्रेकवर तुम्ही जाऊन ट्रेकिंग करू शकतात. या ठिकाणी नैसर्गिकरित्या तयार झालेली मच्छिंद्रनाथ महाराजांची गुहा देखील खूप पाहण्यासारखी व मनाला मोहन टाकणारी आहे. तसेच तोरणमाळ या ठिकाणी महत्त्वाचे असलेले गोरखनाथ मंदिर हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ मानले जाते.

या हिल स्टेशनचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी यशवंत आणि लोटस असे दोन तलाव असून ही दोन्ही तलाव तोरणमाळ हिल स्टेशनचे खास नैसर्गिक आकर्षण आहेत.

लोटस तलावामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणावर कमळाचे फुले एकत्र फुललेली पाहायला मिळतात. हा परिसर हिरव्यागार झाडांनी आणि जंगलांनी वेढलेला असल्याने मनाला खूप प्रसन्नता देऊन जातो.

कसे जाल या ठिकाणी?
जर आपण तोरणमाळ आणि मुंबई यामधील अंतर बघितले तर ते साधारणपणे 465 किलोमीटर आहे. या ठिकाणी तुम्ही रेल्वेने प्रवास करून देखील जाऊ शकतात.

रेल्वेने जाताना तुम्हाला नंदुरबार रेल्वे स्टेशनवर उतरावे लागेल व त्या ठिकाणी बस किंवा कॅबने तोरणमाळला जाता येते. तसेच महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर बसेस या ठिकाणी जाण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही थेट बसने देखील प्रवास करू शकतात.

तसेच तुम्ही कारने देखील प्रवास करत या ठिकाणी जाऊ शकतात.त्यामुळे जीवनातील दररोज असणाऱ्या धावपळीपासून तुम्हाला काही क्षण जर निवांत आणि थंड वातावरण व निसर्गाच्या सानिध्यात घालवायचे असतील तर तुमच्या करिता तोरणमाळ हा एक उत्तम पर्याय ठरेल.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts