Why Market is Down Today : भारतीय शेअर बाजार गेल्या काही दिवसांपासून मोठ्या अस्थिरतेचा सामना करत आहे. गेल्या पाच दिवसांत Sensex 2500 हून अधिक अंकांनी घसरला आहे आणि Nifty 50 देखील 23000 च्या खाली पोहोचला आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 18 लाख कोटींहून अधिक नुकसान झाले आहे.
शेअर बाजारात मोठी विक्री
भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून विक्रीचा प्रचंड दबाव दिसून येत आहे. Sensex: मंगळवारी 1227 अंकांनी घसरून 76,084 वर पोहोचला. Nifty 50: हा 23,000 च्या खाली घसरला, जो मोठ्या घसरणीचा संकेत आहे. Midcap & Smallcap निर्देशांक: दोन्ही निर्देशांक अनुक्रमे 3.9% आणि 3.5% नी कमी झाले. शेअर बाजारातील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 426 लाख कोटींवरून 408 लाख कोटीवर घसरले, याचा अर्थ गुंतवणूकदारांचे 18 लाख कोटी रुपये कमी झाले आहेत.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Marathi-News-5-1.jpg)
शेअर्सवर मोठा परिणाम
Sensex आणि Nifty मधील बहुतांश प्रमुख समभाग मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. HDFC Bank, ICICI Bank आणि Kotak Mahindra Bank: हे 3% पर्यंत खाली आले. Sensex मधील टॉप 30 शेअर्स: सर्वच शेअर्स गडगडले, कोणताही शेअर तेजीत नव्हता.
शेअर बाजाराच्या घसरणीमागील 5 प्रमुख कारणे
बाजारातील अचानक घसरणीमागे अनेक घटक कार्यरत आहेत, ज्यामध्ये परदेशी गुंतवणूकदारांची मोठी विक्री, कमकुवत तिमाही निकाल, भारतीय रुपयाची कमजोरी, उच्च मूल्यांकन आणि व्यापार युद्धाच्या भीतीचा समावेश आहे. आज या बातमीत आपण भारतीय शेअर बाजारातील या मोठ्या घसरणीची कारणे, प्रमुख शेअर्सवरील परिणाम आणि गुंतवणूकदारांनी पुढे काय करावे याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.
1) डोनाल्ड ट्रम्प आणि जागतिक आर्थिक दबाव
मार्केट घसरण्याच पहिले कारण आहे अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारी भागीदारांवर नवीन शुल्क लावण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे जागतिक व्यापारावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. युरोप आणि चीन यासारख्या प्रमुख बाजारपेठांमध्येही मंदीचे संकेत मिळत आहेत, ज्यामुळे भारतीय निर्यातदार आणि मोठ्या उद्योगांवर परिणाम होऊ शकतो. याशिवाय, तेलाच्या वाढत्या किमती आणि मध्यपूर्वेतील तणावांमुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. या सर्व घटकांमुळे जागतिक गुंतवणूकदार अधिक सावध झाले आहेत आणि त्यांनी गुंतवणुकीच्या धोरणात बदल करण्यास सुरुवात केली आहे.
2) परदेशी गुंतवणूकदारांकडून मोठी विक्री
गुंतवणूकदारांच नुकसान होण्याचं दुसरं कारण म्हणजे ऑक्टोबर 2023 पासून विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर शेअर्स विकण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेतील बॉन्ड यील्ड वाढल्यामुळे आणि डॉलर मजबूत झाल्यामुळे, गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसे काढले आहेत. फेब्रुवारी 2025 मध्ये आतापर्यंत (10 फेब्रुवारीपर्यंत) FPI ने 12,643 कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत, तर गेल्या काही महिन्यांत एकूण 2.75 लाख कोटी रुपयांचा भांडवली ओघ बाहेर गेला आहे. हे विदेशी गुंतवणुकीतील मोठे घटक असल्याने बाजारावर विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे.
3)भारतीय बाजारातील उच्च मूल्यांकन
तिसरे कारण म्हणजे अलीकडच्या काळात भारतीय शेअर बाजार मोठ्या वाढीच्या टप्प्यातून गेला आहे. विशेषतः Midcap आणि Smallcap कंपन्यांचे मूल्यांकन (Valuations) खूप जास्त झाले होते. अनेक कंपन्यांचे शेअर्स त्यांच्या वास्तविक मूलभूत मूल्यांपेक्षा महाग झाले होते, विश्लेषकांच्या मते, भारतीय बाजार अजूनही महाग वाटतो, त्यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांनी विक्री करून नफा वसुलीला प्राधान्य दिले आहे. परिणामी, बाजारात मोठी घसरण झाली आहे.
4)रुपयाची कमजोरी
मार्केट घसरण्याची चौथे कारण म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपयाची सतत घसरण सुरू आहे. 2024 च्या सुरुवातीपासून रुपया 3% ने घसरला आहे, ज्याचा परिणाम परकीय गुंतवणुकीवर होत आहे. सोमवारी भारतीय रुपया 88 च्या जवळ पोहोचला होता, मात्र मंगळवारी त्यात सुधारणा होऊन तो 61 पैशांनी वधारला. रुपयाच्या घसरणीमुळे आयात महाग झाली आहे, परिणामी भारतीय बाजारपेठेतील वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सावध झाले आहेत आणि त्यांनी बाजारातून पैसे काढण्यास सुरुवात केली आहे.
5)कंपन्यांचे तिमाही निकाल
पाचवे आणि शेवटचे कारण अर्थातच भारतीय कंपन्यांचे 2025 च्या तिसऱ्या तिमाहीचे (Q3) आर्थिक निकाल ! जे अपेक्षेप्रमाणे चांगले आले नाहीत. ग्राहक वस्तू (FMCG), ऑटोमोबाईल आणि बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांचे निकाल निराशाजनक ठरले आहेत. यामुळे अनेक मोठ्या समभागांची विक्री वाढली. याशिवाय, काही कंपन्यांचे P/E गुणोत्तर (Price to Earnings Ratio) खूप जास्त झाले होते, त्यामुळे गुंतवणूकदारांनी नफा बुक करण्यास सुरुवात केली आहे.
गुंतवणूकदारांनी पुढे काय करावे? सुरक्षित पर्याय कोणते?
बाजारातील अस्थिरता अजून काही दिवस राहू शकते, त्यामुळे गुंतवणूकदारांनी संयम बाळगणे गरजेचे आहे.
- Large Cap कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित ठरू शकते, कारण या कंपन्यांची बाजारातील स्थिती मजबूत आहे.
- बँकिंग, IT, ऑटो, फार्मा आणि कॅपिटल गुड्स क्षेत्रातील मजबूत कंपन्या चांगला परतावा देऊ शकतात.
- मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करताना कंपनीच्या तिमाही निकालांचा विचार करावा.
- बाजार स्थिर झाल्यावर नवीन गुंतवणुकीसाठी योग्य संधी शोधाव्यात.