Maji Ladki Bahin Yojana:- महाराष्ट्राच्या पटलावर महायुती सरकार विराजमान होण्यामागे लाडकी बहीण योजनेचा मोठा हात असल्याचे बोलले जात आहे. एकंदरीत विधानसभा निवडणुकीमध्ये सत्तेवर आलेल्या महायुती करिता ही योजना खूप मोठी गेमचेंजर ठरली.
आपल्याला माहित आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये महिन्याला पंधराशे रुपये जमा केले जातात व आतापर्यंत साधारणपणे नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे महिलांच्या खात्यावर थेट जमा करण्यात आले आहेत.
परंतु आता निवडणूक झाल्यानंतर मात्र या योजनेबद्दल अनेक तर्कवितर्काना पेव फुटले असून आता या योजनेतील महिला लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी करून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात येतील अशा प्रकारचे दावे केले जात आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ आणि रिल्स अशा प्रकारची माहिती पसरवताना दिसून येत आहे.
त्यामुळे याबाबत राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाला सातत्याने विचारणा होत आहे. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांना माझी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांना सामोरे जावे लागत आहे.
शेवटी राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने या योजनेबाबत ज्या काही अफवा पसरवल्या जात आहेत त्यांचे खंडण केले आहे व इतकेच नाही तर या विभागाने या योजनेबाबत जे काही लोकांमध्ये चुकीच्या बातम्या किंवा संभ्रम पसरवले जात आहेत
तो दूर करणारे एक पत्रकच जारी केले आहे हे पत्रक आमदार आदिती तटकरे यांनी समाज माध्यमांवर शेअर केले आहे व त्यांनी या पत्रकासह त्यांच्या एक्स अकाउंट वर एक पोस्ट देखील केली आहे.
आमदार आदिती तटकरे यांनी काय म्हटल आहे पोस्टमध्ये?
आमदार आदिती तटकरे यांनी याबाबत पोस्ट केली असून त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल रिल्स व व्हिडिओच्या माध्यमातून जी काही दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कुठलाही बदल झालेला नाही, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून प्रसारित करण्यात आली आहे.
एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून मी यावर स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे तरी याबाबत समाज माध्यमातुन होणाऱ्या अपप्रचाराला कोणीही बळी पडू नये ही नम्र विनंती. अशा पद्धतीची पोस्ट त्यांनी केली आहे.
महिला व बालकल्याण विभागाने काय म्हटले आहे जारी केलेल्या पत्रकात?
इतकेच नाही तर राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून देखील एक परिपत्रक जारी करण्यात आले असून यामध्ये म्हटले आहे की, सर्वांना कळविण्यात येते की, राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या असे निदर्शनास आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत समाज माध्यमांवरील व व्हिडिओद्वारे वेगवेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे.
त्यामुळे या योजनेच्या लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे. या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अटी व शर्ती मध्ये तसेच योजनेच्या सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही.
तसा बदल झाल्यास प्रशासनाकडून आपणास कळविण्यात येईल. इतकेच नाही तर या विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांना सुचवले आहे की,त्यांनी लोकांमधील संभ्रम दूर करावा.
योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी असे देखील म्हटले आहे.