स्पेशल

उच्च शिक्षण घेऊन नोकरी नाही म्हणून धरला शेतीचा रस्ता! नायगावचा मनोज शितोळे वांग्यातून कमावतो लाखो रुपये

तरुणाईची जर सध्याची स्थिती पाहिली तर ती बिकट अशी होत चाललेली आहे. कारण ग्रामीण भागाच्या दृष्टिकोनातून जर बघितले तर अनेक शेतकरी कुटुंबांमधील तरुण मुले परिस्थितीशी झगडत उच्च शिक्षण पूर्ण करतात व शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला चांगल्या ठिकाणी नोकरी मिळेल व दोन पैसे आपण मिळवू शकू ही प्रत्येकाची इच्छा असते.

परंतु सध्याची जर परिस्थिती बघितली तर नोकऱ्याची उपलब्धता खूपच कमी असल्याने नोकरीसाठी वणवन भटकण्याची वेळ तरुणांवर आलेली आहे. सध्याच्या ज्या काही भरती प्रक्रिया राबवण्यात येतात यामध्ये रिक्त जागांच्या तुलनेमध्ये दाखल झालेल्या अर्जांची संख्या पाहिली तर बेरोजगारी किंवा नोकरीची समस्या किती भीषण आहे हे आपल्याला दिसून त्यामुळे शिक्षण घेतले तरी नोकरी न मिळाल्याने मोठ्या संख्येवर तरुणांचे खूप मोठ्या प्रमाणावर हाल सध्या होताना दिसून येत आहेत.

त्यामुळे याही परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी अनेक तरुण आता वेगवेगळ्या व्यवसायाकडे वळत असून ग्रामीण भागातील तरुण त्यांच्या घरच्या शेतीमध्येच आता नशीब आजमावतांना आपल्याला दिसून येत आहेत.

परंतु शेतीमध्ये तरुणांनी आता पाऊल ठेवल्याने  शेतीमध्ये देखील आता अनेक मोठे बदल आपल्याला दिसून येत असून यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीतून लाखोत आर्थिक उत्पन्न मिळवून स्वतःची आर्थिक समृद्धी तरुण साधताना दिसत आहेत.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात असलेल्या नायगावचे मनोज शितोळे यांचे उदाहरण घेतले तर यांनी देखील पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले व नोकरी शोधायला सुरुवात केलेली होती. परंतु नोकरी काही मिळाली नाही. त्यामुळे मनोज यांनी त्यांची वडिलोपार्जित शेती करण्याचे ठरवले व यामध्ये आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेऊन प्रवासाला सुरुवात केली.

 वांग्यातून घेतो लाखोंची कमाई

याबाबत सविस्तर वृत्त असे की, धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात असलेले नायगाव या गावचे शेतकरी मनोज शितोळे यांनी पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर मात्र नोकरी शोधायला सुरुवात केली. परंतु नोकरी शोधत असताना कोणत्याही ठिकाणी त्यांना नोकरी मिळाली नाही व शेवटी त्यांनी घरची वडीलोपार्जित अडीच एकर शेती करण्याचे ठरवले.

जेव्हा शेती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला तेव्हा ती शेती पारंपारिक पद्धतीने न करता आधुनिक पद्धतीने करावी असा निर्णय त्यांनी घेतला व यासाठी प्रयत्न सुरू केले. आधुनिक शेतीच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असताना पोखरा या योजनेतून त्यांनी पॉलीहाऊस आणि नेट हाऊसचा लाभ घेतला व या ठिकाणाहून त्यांचा आधुनिक शेतीचा प्रवास सुरू झाला.

या सगळ्या तंत्रज्ञानाने त्यांनी सुरुवातीला खूप चांगले उत्पन्न मिळवायला सुरुवात केली. भाजीपाला पिकांची लागवड करण्याचा  निर्णय घेतल्यानंतर त्यांनी भरिताचे वांग्याची लागवड करण्याचे ठरवले व मे महिन्यामध्ये भरीत वांग्याचे लागवड केली. एक एकर क्षेत्रामध्ये त्यांनी 3200 भरीत वांग्याचे रोपे लावली.

या सगळ्या वांगा पिकाचे व्यवस्थापन व नियोजन अगदी चोख आणि वेळेत केले आणि उत्तम मशागतीमुळे त्यांना वांग्याचे उत्पादन देखील चांगले मिळाले.

आतापर्यंत त्यांनी तेरा टन भरीत वांग्याचे उत्पादन घेतले असून त्याची विक्री केली आहे व आणखीन 25 ते 30 टन या वांग्याचे उत्पादन त्यांना मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे. बाजारपेठेत या भरीत वांग्याला 20 ते 30 रुपये प्रति किलोचा दर सध्या मिळत असून त्या माध्यमातून ते लाखोंचे उत्पन्न मिळवत आहेत.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts