स्पेशल

कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी विकत न घेता प्रॉपर्टीत गुंतवणूक करून कमावता येतो लाखोत नफा ! पण कोणते आहेत पर्याय?

बरेच जण रियल इस्टेटमधील गुंतवणूक करून लाखोत नफा कमवतात. परंतु रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करून प्रत्येकालाच नफा मिळवता येणे शक्य होत नाही. कारण रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे हे प्रत्येकाला शक्य होईल अशी गोष्ट नाही. कारण यासाठी फार मोठ्या प्रमाणावर भांडवल लागते आणि तुमच्याकडे अशा प्रकारचे भांडवल नसेल आणि तुम्हाला बँकेकडून कर्ज वगैरे घेऊन जर पैसा उभा करायचा असेल तर बँक तुम्हाला त्या प्रमाणात पैसे देईल याची कुठल्याही प्रकारची शाश्वती नसते.

त्यामुळे बऱ्याच जणांचे रियल इस्टेटमधून पैसा कमावण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहते. परंतु तुम्हाला माहित आहे का की, तुम्हाला एखादी प्रॉपर्टी खरेदी न करता देखील चांगल्या पद्धतीने पैसा मिळवता येतो. होय हे खरे आहे व यासाठीचे काही पर्याय असतात व यामध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर सरळ तुम्ही रिअल इस्टेट क्षेत्रातून चांगला नफा मिळवतात.

कुठलीही प्रॉपर्टी खरेदी न करता रियल इस्टेटमधून कमवा पैसा

रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट अर्थात रिट्स –

जर आपण भारतीय रिअल इस्टेट क्षेत्राचा विचार केला तर यामध्ये सध्या रियल इस्टेट इन्वेस्टमेंट ट्रस्ट म्हणजेच रिट्स(REITs)ची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. रियल इस्टेटमध्ये गुंतवणूकीचा हा प्रकार म्युच्युअल फंड सारखा आहे. म्हणजे आपल्याला माहित आहे की ज्याप्रमाणे म्युच्युअल फंडची कुठलीही योजना ही अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे जमा करते व ते पैसे चांगल्या कंपन्यांचे शेअर्स आणि बॉण्डमध्ये गुंतवणूक करते. अगदी याच पद्धतीने रिट्स देखील गुंतवणूकदारांकडून पैसे जमा करते व रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करते. यामध्ये अगोदर दोन लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागत होती. परंतु आता ती 50 हजार रुपयांवर करण्यात आलेली आहे. यामध्ये सेबीने हस्तक्षेप करत यामध्ये कपात केली व सर्व सामान्यांना परवडेल अशा किमतीत आता गुंतवणूक करता येते. या पर्यायाचा वापर करून तुम्ही अगदी दहा ते पंधरा हजार रुपयांमध्ये रिट्सच्या माध्यमातून रियल इस्टेट क्षेत्रामध्ये गुंतवणूक करू शकतात.

रियल इस्टेट म्युच्युअल फंड –

ज्याप्रमाणे mutual fund च्या योजना लोकांकडून पैसे जमा करतात व ते चांगल्या शेअर्स व बॉण्ड्समध्ये गुंतवतात. अगदी त्याचप्रमाणे रियल इस्टेट म्युच्युअल फंड हे रियल इस्टेट मधील कंपन्यांमध्ये किंवा त्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. अशाप्रकारे तुम्ही देखील म्युच्युअल फंडच्या माध्यमातून अगदी कमीत कमी गुंतवणुकीतून रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकता.

रियल इस्टेट विक्रेता –

आता ही पद्धत सगळ्यांना माहिती आहे. कारण यामध्ये कुठल्याही प्रकारची गुंतवणूक न करता देखील तुम्ही रिअल इस्टेट क्षेत्राच्या माध्यमातून चांगला नफा मिळवू शकतात. यामध्ये फक्त तुमचा जनसंपर्क उत्तम असणे गरजेचे असते व रियल इस्टेट क्षेत्रामधील प्रत्येक गोष्ट तुम्हाला व्यवस्थित माहिती असणे फायद्याचे ठरते. म्हणजे सध्या घरांचे दर काय सुरू आहेत किंवा लोकांची मागणी कशी आणि किती आहे? लोकांच्या मागणीप्रमाणे त्यांना पुरवठा होऊ शकतील अशी घरी किती उपलब्ध आहेत अशी माहिती तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे. या सगळ्या जोरावर तुम्ही रियल इस्टेट एजंट बनुन रिअल इस्टेटच्या विक्रीतून चांगला नफा मिळवू शकतात. तसेच एखाद्या प्रॉपर्टीमध्ये कमीत कमी गुंतवणूक करून तुम्ही ती प्रॉपर्टी चढ्या दाराने विकून देखील नफा मिळू शकतात.

रियल इस्टेट ईटीएफ –

आपल्याला माहित आहे की शेअर मार्केटमध्ये स्टॉक जसे विकले जातात अगदी त्याचप्रमाणे ईटीएफची देखील खरेदी विक्री होते. आपल्याला माहित आहे की, जसे तुम्हाला सोने गोल्ड ईटीएफच्या माध्यमातून खरेदी करता येते अगदी त्याचप्रमाणे तुम्ही रियल इस्टेटच्या माध्यमातून रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकता. रियल इस्टेट ईटीएफ मधील ज्या कंपन्या आहेत त्या बांधकाम तसेच हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि इतर कमर्शिअल प्रॉपर्टीज यामध्ये गुंतवणूक करत असतात.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts